तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 17 April 2019

धनंजय मुंडे यांचे हातबळकट करण्यासाठी बजरंगबप्पांना प्रचंड मताधिक्यांनी विजयी करा-अँड. प्रकाश मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- सर्वसामान्य जनता कष्टकरी, शेतमजूर आणि शेतकरी सर्व बाजूने अन्याय झालेला आहे, त्यांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर हे सरकार सत्तेवरुन खाली खेचले पाहिजे त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षाने एकत्र येवून बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे या शेतकर्‍याच्या लेकराला उभे केले आहे.  बजरंगबप्पांना विक्रमी मतांनी निवडून द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते अँड. प्रकाश मुंडे यांनी केले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-स्वाभिमानी शेतकरी संघटना-रिपाई (कवाडे गट)-मानवी हक्क अभियान व मित्र पक्ष आघाडीचे लोकसभेचे उमेदवार शेतकरीपुत्र बजरंग सोनवणे यांना विजयी करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे सर्वेसर्वा जानताराजा शरदचंद्र पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे हातबळकट करण्यासाठी महाआघाडीच्या उमेदवारांना लोकसभेत पाठवावे. भाजप-शिवसेना सरकारच्या धोरणांवर जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.  उत्पादन खर्चावर आधारित शेती मालाला भाव स्वामिनाथन आयोग लागू का करीत नाहीत असा सवाल त्यांनी केला तसेच बँकेला चुना लांवणारे पळून जातात मग चौकीदार काय करतोय?  तसेच विकास कुठं दिसत नाही. ग्रामीण भागातील विकास कामांना गती मिळेल. म्हणुन त्यांना संसदेत पाठवा.  स्व.गोपीनाथ मुंडे यांचा सक्षमपणे राजकीय वारसा चालविण्याची ताकद धनंजय मुंडे यांच्यामध्येच असल्याचे परळीच्या जनतेने यावेळी चांगलेच ओळखले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पूर्ण ताकदिशी बजरंग सोरवणे यांच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघ पिंजून काढत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूकीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बीड लोकसभेचे संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना विक्रमी मताधिक्य मिळणार आहे. तरुण, शेतकरी कर्जमुक्त व शेतमालाला दीडपट हमीभाव मिळण्याचे कायदेशीर अधिकारासाठी शेतकर्‍यांनी महाआघाडी उमेदवार बजरंग सोनवणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. दि. १८ एप्रिल रोजी मतदानातून व्यक्त करून आपले आशीर्वाद बजरंगबप्पांना देऊन प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते अँड. प्रकाश मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment