तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

धर्माबाद तालुक्यात निवडणूक यंत्रणा सज्ज


धर्माबाद : ( तालुका प्रतिनिधी ) 
दिनांक 18 एप्रिल रोजी होणाऱ्या  लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 16 लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रशांत शेळके, सहाय्यक निवडणूक निर्णय तथा उपविभागीय अधिकारी डाॅ. सचिन खल्लाळ व सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी नुरल हसन यांच्या  नियंत्रणाखाली विविध पथके स्थापन करून दिवस-रात्र काम करण्यात यंत्रणा सज्ज आहे.      
धर्माबादचे तहसीलदार ज्योती चौहान, ग्रामीण विभाग आचार संहिता पथक प्रमुख तथा धर्माबादचे गटविकास अधिकारी मोहन जाधव, शहर विभाग आचार संहिता पथक प्रमुख तथा धर्माबाद नगरपालिकेचे  मुख्याधिकारी मंगेश देवरे, धर्माबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भागवत जायभाये, कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे, नायब तहसीलदार निवडणूक सुनील माचेवाड, नायब तहसीलदार महसूल सय्यद उमर, नायब तहसीलदार महसूल एस. एन. हांदेश्वर हे नियंत्रण ठेवून आहेत. झोनल अधिकारी अरविंद जाधव ,अभियंता संजय कांबळे, अभियंता एच. आर. नरवाडे, के. एम. कलेटवाड, डॉ. विकास गड्डेवाड, डॉ. आर.आर. इंदलवाड ,डॉ. आर. एल. पडगिलवार, सी. पी. शंकरोड हे त्यांना नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था ,मतदान केंद्रावरील व्यवस्था, पोलचिट वाटप व मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
    तेलंगणा राज्य सीमेवर स्थिर संरक्षण पथक (एसएसटी) पथक बन्नाळी - तानुर चेक पोस्टचे पथक प्रमुख पी. डी. पारसेवार, ए. के. धनवडे, एच. डी. देबडवार, बेलूर बुद्रुक-कंदकुर्तीचे पथक प्रमुख अभियंता मसूद खान, अभियंता एम. एम. काटकर, विस्तार अधिकारी आर. डी. जाधव तसेच बासर-येळवत  चेक पोस्टचे पथक प्रमुख जि. एच. चिट्टेवाड, एम. एम. चंदापूरे, विस्तार अधिकारी बी. जी. वडजे व त्यांचे सहाय्यक 24 तास चेक पोस्टवरील वाहतुकीची तपासणी करीत आहेत.
   तालुक्यात फिरते पथकचे पथक प्रमुख कृषी अधिकारी विश्वास अदापुरे, आर. डी. ढगे, विस्तार विस्तार अधिकारी एस. एल. केंद्रे व त्यांचे सहाय्यक, व्हिडिओ टीमचे प्रमुख विस्तार अधिकारी एल. एन. गोडबोले, वाय. एल. माळगे व त्यांचे सहाय्यक हे शहरी व ग्रामीण भागात दिवस-रात्र सभेस उपस्थित राहत  आहेत.      
मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप प्रमुख तथा गट शिक्षणाधिकारी डॉ. डी. एस. मठपती व त्यांची टीम यांनी तालुक्यातील 85 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या सहकार्याने शहरातील महाविद्यालय, प्रशालेत चुनाव पाठशाला, पथनाट्य स्लोगन तयार करून प्रभातफेरी चुनाव पाठशाला सदस्यांमार्फत घरोघरी भेटी देऊन मतदान जनजागृती करून मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
तालुक्यात शहरी भागात 27 मतदान केंद्र व ग्रामीण भागात 58 मतदान केंद्र असे एकूण 85 मतदान केंद्रावर चुनाव पाठशाला पथनाटय, एनसीसी - स्काऊट गाईडचे विद्यार्थी मार्फत जनजागृती करत आहेत.
धर्माबाद तालुक्यात पुरुष मतदारांची संख्या 37 हजार 192 आहे तर महिला मतदारांची संख्या 35 हजार 823 असे एकूण मतदारांची संख्या 73 हजार 015 आहे. सर्व मतदारांना पोलचिटचे वाटप करून मतदान सुरळीत चालावे व मतदान टक्केवारी वाढावे यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करीत आहे. 
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य एम. बी. कुलकर्णी, शिल्प निदेशक आनंद पुपुलवाड, अंकुश चापलकर आर. व्ही. आंबटवार, श्रीमती बोलमवार यांनी  ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक देवून मतदारात मतदान जागृती केली.       
    कायदा व सुव्यवस्था तसेच विविध सभेवर नियंत्रण ठेवण्यासाठी धर्माबाद पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भागवत जायभाये व कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी विनोद कांबळे यांच्या नियंत्रणाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल सनगले, चंद्रशेखर मोरखंडे, डीएसपी जे सलीम पठाण, चंपत कदम, एस. एस. आनेराव, डी. एल. जाधव व पोलीस यंत्रणा हे नियंत्रण ठेवून आहेत.
धर्माबाद तहसिल कार्यालयातील अ का जी. व्ही. राचेवाड, श्रीमती एस. एस. गवारगुरू, एस. व्ही. वारेवार, मंडळ अधिकारी बी. डी. पवळे, गरूडकर, स्वीप कक्षाचे अरूण ऐनवाले, उदयकुमार शिल्लारे, निवडणुक विभागाचे मिलिंद टोणपे, मोहन भंडरवाड आदी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

No comments:

Post a Comment