तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 17 April 2019

खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा-नितीन मुंडे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
भाजपा-शिवसेना-रिपाई-रासप-रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांनी तळेगाव येथे भेट दिली असता त्यांचे गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तळेगाव येथील गावातील येथे भेट देऊन मतदारांशी संवाद साधला. तसेच टोकवाडी पंचायत समिती गणातुन सर्वाधिक मताधिक्य देऊन प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भाजपाचे युवा नेते नितीन मुंडे यांनी केले आहे. 


      परळी तालुक्यातील काल  संवाद दौऱ्यानिमीत्त तळेगाव येथे लोकप्रिय खा डॉ प्रीतम ताई गोपीनाथ मुंडे आल्या असताना त्यांचा सत्कार करताना भाजपा सोशल मीडिया तालुका अध्यक्ष नितीन मुंडे,विष्णू मुंडे,गोविंद मुंडे,रोहन मुंडे,मंगेश मुंडे आदी गावातील युवा कार्यकर्ते दिसत आहेत व जास्तीत जास्त मतांची तळेगांव मधून लीड देऊ असे आव्हान नितीन मुंडे यांनी केले.

 बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील तळेगाव येथे भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.
लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन सर्वसमावेशक काम करत आहोत, बीड जिल्ह्याच्या विकासाचा प्रवास सुरु असून आपल्या सर्वांच्या साथीने हा प्रवास आनंदाने सुरु आहे, हा विकासाचा प्रवास निरंतर सुरु ठेवण्यासाठी तुम्हा सर्वांच्या मतदानरुपी ऊर्जेची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. येत्या १८ एप्रिल रोजी कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून मतदान रुपी ऊर्जा माझ्या पाठीशी उभी कराल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी भाजपा सोशल मीडिया तालुका अध्यक्ष नितीन मुंडे,विष्णू मुंडे,गोविंद मुंडे,रोहन मुंडे,मंगेश मुंडे यांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment