तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

निवडणूक कर्मचारीच मतदानापासून वंचित राहणार


अनेकांना निवडणूक कार्य प्रमाणपत्रच मिळाले नाही

प्रतिनिधी
सेलू ( जि.परभणी ) : परभणी लोकसभा मतदारसंघातील सेलू तालुक्यातील निवडणूकीसाठी  नियुक्त कर्मचाऱ्यांचे निवडणूक कार्य प्रमाणपत्र (ईडीसी) मंगळवारी ( ता.१६ ) सायंकाळी सात वाजेपर्यंत न आल्याने अनेक कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार असल्याचे चिंताजनक चित्र निर्माण झाले आहे. 
सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद, खासगी शाळांतील शिक्षक कर्मचारी निवडणूक विभागाने निवडणूक कामासाठी घेतलेले आहेत. त्यांची नियुक्ती परभणी, गंगाखेड, पाथरी आदींसह अन्य मतदार संघात नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कर्मचार्‍यांनी १२-अ हे प्रपत्र रविवारी ( ता.२४ मार्च )  निवडणूक विभागाकडे जमा केले. काहींनी स्पीड पोस्टाने  पाठवले. आठवडाभरापासून प्रमाणपत्रासाठी कर्मचारी तहसील कार्यालयात चकरा मारीत आहेत. काहींनी तीन-चार वेळा प्रपत्र भरून दिलेत मात्र अद्यापही प्रमाणपत्र प्राप्त झाले नाहीत. यामुळे हे कर्मचारी मतदानापासून वंचित राहणार असल्याने संतप्त झाले आहेत.

याला जबाबदार कोण ?   
निवडणूक कार्य प्रमाणपत्रा अभावी कर्मचारी मतदानापासून वंचित राहिल्यास याला जबाबदार कोण ? शत प्रतिशत मतदानासाठी आयोगाकडून जनजागृती केली जातेय. प्रशिक्षणादरम्यान नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना कर्तव्यात कसूर केल्यास नियमाचा बडगा दाखवून धमकावले जाते. मात्र निवडणूक कार्य प्रमाणपत्र देण्यासाठी कोणतेही नियोजन का गेले नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात विचारणा करण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी तहसील कार्यालयात उपस्थित नाही. कर्मचारी संख्याचा निश्चित संख्या कोणी सांगत नाही.

जबाबदार कोण : दिलीप मोगल

निवडणूक कार्यासाठी कर्मचारीच मतदाना सारख्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहणार असेल, तर याला जबाबदार कोण ? प्रमाणपत्र न देणाऱ्या अधिकार्‍यांवर काय कारवाई करणार , असा प्रश्न प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप मोगल यांनी उपस्थित केला.

No comments:

Post a Comment