तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

तालुका कृषी विभाग,विमा कंपनीचा निषेध करत वाघाळा ग्रामस्थांनी मतदानावरील बहिष्कार घेतला मागे


प्रतिनिधी
पाथरी:-लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर पिकविमा न दिल्याने वाघाळा ग्रामस्थांनी बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन दिले होते. मात्र  सोमवार पर्यंत वीमा कंपनी आणि कृषी विभागाने कुठलीही ठोस कार्यवाही न केल्याने या दोहोंचा निषेध करत मतदानावर टाकलेला बहिष्कार मागे घेत लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत मतदान करणार असल्याचे निवेदन मंगळवार १६ एप्रिल रोजी महसुल प्रशासनाला दिले असल्याची माहीती प्रसिद्धी पत्रका व्दारे देण्यात आली आहे.
पाथरी तालुक्यात दुष्काळ जाहिर करण्यात आला आहे. मात्र असे असतांनाही इफको टोकियो इंन्शुरन्स कंपनी पुणे. यांनी शेतक-यांना खरीपाचा पिकविमा दिला नसल्याने तालुक्यातील बाभळगाव मंडळातील कान्सूर ग्रामस्थांनी सर्व प्रथम लोकसभा मतदान प्रक्रीयेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन तहसिल प्रशासनाला निवेदन दिल्या नंतर या मंडळातील अंधापुरी, बाभळगाव, लिंबा, आनंदनगर, लोणी बु. डाकु पिंप्री, गुंज आणि पाथरी मंडळातील वाघाळा ग्रामस्थांनी २७ मार्च रोजी या नंतर तालुका कृषी अधिकारी,महसुलचे अधिकारी यांनी या गावांना भेटी देऊन शेतक-यांची मते जाणुन घेतली होती मात्र शेतकरी आपल्या मतांवर ठाम होते या नंतर उपविभागिय अधिकारी व्हि एल कोळी, तहसिलदार भाग्यश्री देशमुख ,गटविकास अधिकारी बी टी बायस,तालुका कृषी अधिकारी  शिंदे यांच्या पथकाने दुसरा टप्पा म्हणून या शेतक-यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र शेतकरी,ग्रामस्थ निर्णयावर ठाम होते मंगळवार १६ एप्रिल रोजी विमा कंपनी आणि तालुका कृषी विभाग यांचा जाहिर निषेध करत लोकशाही बळकट करण्या साठी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकी वरील घातलेला बहिष्कार मागे घेण्या बाबतचा प्रस्ताव संमत करून या बाबतचे निवेदन पाथरी तहसिल कार्यालयाला दिले असल्याची माहिती तहसिल प्रशासनाने प्रसिद्धी पत्रका व्दारे दिली आहे,.

No comments:

Post a Comment