तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 3 April 2019

येडं पेरलं अन खुळं उगवलं – धनंजय मुंडेचा हल्लाबोल


पुणे (प्रतिनिधी) :- लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी 'येडं पेरलं आणि खुळं उगवलं' अशा शब्दात ट्‌विटरवरून टीका केली आहे. 

रावसाहेब दानवे हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. यामुळे विरोधक त्यांच्यावर टीका करताना दिसतात. जालना येथे दानवे यांनी भारतीय विंग कमांडर अभिनंदन यांचा 'हेलिकॉप्टरचा पायलट' असा उल्लेख केला आहे. वास्तविक अभिनंदन हे भारताच्या फायटर विमानांचे जिगरबाज पायलट आहेत. दानवे यांच्या वक्तव्यानंतर दानवे त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. 

धनंजय मुंडे यांनी ट्‌विटरवरून टीका करताना म्हटले आहे की, 'बे एके बे, बे दुने चार, बे त्रिक बेअक्कल, यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-21 आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष... 'येडं पेरलं आणि खुळं उगवलं' अशी गत आहे सगळी.'

No comments:

Post a Comment