तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत


अंबाजोगाईत उद्या भाजप महायुतीची भव्य विजयी संकल्प सभा

बीड (प्रतिनिधी) :- दि. ११ ----- लोकसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात भाजपच्या वतीने उद्या (ता. १२) अंबाजोगाई येथे भव्य विजयी संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा होणार आहे. 

  भाजपा-शिवसेना- रिपाइं-रासप आणि रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे. अंबाजोगाई शहरातील वंजारी वस्तीगृहा जवळील मैदानावर सायंकाळी ५ वा. होणा-या या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे तसेच आमदार भीमराव धोंडे, आ. आर.टी. देशमुख, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. सुरेश धस, आ.संगीता ठोंबरे, आ. लक्ष्मण पवार, माजी आमदार बदामराव पंडित, केशवराव आंधळे, आदिनाथ नवले, गोविंदराव केंद्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, रिपाइंचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, रासपचे बालासाहेब दोडतले आदी यावेळी उपस्थित होते राहणार आहेत. 

ऐतिहासिक सभेची जय्यत तयारी
-------------------------------------
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणा-या या सभेची भाजपच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. सभेसाठी जिल्हयाच्या काना कोप-यातून लाखोंच्या संख्येने मतदार बांधव उपस्थित राहणार आहेत. पोलिस प्रशासनाने देखील यानिमित्ताने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्हयात आतापर्यंत सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी पाहता भाजपा महायुतीच्या उमेदवार डाॅ प्रितमताई मुंडे हया इतर उमेदवारांपेक्षा प्रचारात वरचढ ठरल्या असून प्रचंड मोठ्या फरकाने त्या विजयी होणार आहेत. दरम्यान  उद्याच्या सभेसाठी नागरिकांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा महायुती प्रचार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment