तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 29 April 2019

भारतीय जन सम्राट पार्टीच्या अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष पदी अब्दुल युसूफ शेख यांची नियुक्ती


संग्रामपूर  (प्रतिनिधी] 
संग्रामपूर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अब्दुल युसूफ शेख यांची नुकतीच एका नियुक्ती पत्राद्वारे भारतीय जन सम्राट पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किशोर केळोदे यांनी पार्टीच्या अल्पसंख्यांक.सेल.जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे विशेष म्हणजे  यापूर्वी विविध राष्ट्रीय युवा लोकसंघटना ,राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समिती,मुस्लिम दलित बहुजन परिषद अश्या विविध सामाजिक संघटन विविध पक्षात काम करण्याचा दांडगा अनुभव आहे अब्दुल युसूफ शेख आपल्या नियुक्ती चे श्रेय पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब बावणे व जिल्हाध्यक्ष किशोर केळोदे यांना देत असुन संपूर्ण जिल्ह्यात भारतीय जन सम्राट पार्टीच्या अल्पसंख्यांक.सेलला मजबूत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले

No comments:

Post a comment