तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 5 April 2019

ना.पंकजाताईंमुळेच मला चांगले दिवस, केज मतदार संघात राष्ट्रवादीचे नेते कोणाच्या पाठीत खंजर खुपसणार ? - आ.सुरेश धस यांचा सवालबीड (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्याच्या राजकारणात मला राजकीय प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी केले असुन त्यांच्या नेतृत्वामुळे बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होत आहे.अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेवून त्यांनी सामान्य लोकांच्या हिताची जपवणूक केली.गेवराई मतदार संघाच्या राजकारणाचा हिशोब मागणार्‍या विरोधीपक्ष नेत्याने अगोदर केज मतदार संघात तुम्ही कोणाच्या पाठीत खंजर खुपसणार ? हे सांगावे असा सवाल राज्याचे माजी मंत्री तथा विधान परिक्षत आ.सुरेश धस यांनी केला आहे.आष्टी,पाटोदा मतदार संघातून आम्ही प्रितमताईंनी प्रचंड मताधिक्य मिळवून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक पार्श्‍वभूमीवर महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारार्थ आ.सुरेश धस हे आष्टी मतदार संघात जनसंपर्क दौर्‍यावर असुन एकाच दिवशी पंधरा ते वीस गावांना प्रत्यक्ष गाठीभेटी देत आहेत.आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलतांना त्यांनी सांगितले की, बीड जिल्ह्याच्या हितासाठी ना.पंकजाताई मुंडेंचे नेतृत्व फायदेशीर असुन त्यांनी मागच्या चार वर्षात जिल्ह्यासाठी करोडो रूपयांचा निधी आणून विकासाची चळवळ उभा केली आहे.राष्ट्रवादी पक्षाच्या नेतृत्वामुळे मी जेंव्हा राजकारणात अडचणीत आलो तेंव्हाच पंकजाताई माझ्या मदतीसाठी धावून आल्या एवढेच नव्हे तर त्यांच्यामुळेच मला राजकारणात चांगले दिवस आले स्थानीक स्वराज्य संस्था निवडणूकीत केवळ उमेदवारीच दिली नाही तर माझ्यासाठी जिवाचे रान करत त्यांनी निवडूनही आणल्याचे ते म्हणाले.लोकसभा निवडणूकीत प्रितमताई मुंडेंचा विजय निश्‍चित असुन विरोधक केवळ दिशाभुल व अपप्रचार करत असल्याची टिका त्यांनी केली.मुंडे भगिनीने जिल्ह्याच्या राजकारणात विकासाचा सेतू बांधल्यानंतर खर्‍या अर्थाने त्यांच्यावर टिका करण्याचा नैतीक अधिकारी विरोधी पक्षाला नाही मात्र केवळ विरोधासाठी विरोध करायचा म्हणून बिनबुडाचे आरोप लावत ते फिरत आहेत.गेवराई मतदार संघाचा राजकीय हिशोब मागतांना त्यांनी केलेली टिका लक्षवेधी नसली तरी केज विधान सभा मतदार संघात त्यांनी मुंदडा आणि साठे दोघांनाही विधान सभेची उमेदवारी देऊ केली केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या दोन गटात केलेले समेट आणि दिलेला शब्द ही राजकीय चेष्टा आहे.विधान सभेला खंजीर मुंदडाच्या पाठीत खुपसणार का साठेच्या ? हे त्यांनी अगोदर सांगावे हे आवाहनही त्यांनी केले आहे.राष्ट्रवादी पक्ष घरफोडी पक्ष असल्याचे जाहिरपणे सांगतांना ते म्हणाले की निष्ठावान कार्यकर्त्याला सन्मान कधीच मिळत नाही.राष्ट्रवादीचे नेतृत्व कोणत्या वेळीकाय निर्णय घेईल याचे भविष्य कोणी सांगत नाही.ऐनवेळी लोकसभेचा उमेदवार बदलून जादूच्या कांडीचा झालेला बदल कशाच्या धोतक असल्याचे ते म्हणाले.यावेळी घाटायेथील उपसरपंच विनायक मुळीक,दुध संघाचे संजय गाढवे,गोवर्धन तळेकर,शत्रघुन मराठी,राजु भोसले,रावसाहेब लोखंडे,शिवलाल कासवा,विजय गाढवे,ज्ञानबा साळवे,मनोजसेठ गाढवे,मनोज सिगवी,लक्ष्मण तळेकर,अशोक साबळे,समीर शेख,शाहु झांजे,बंडु तळेकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.या तालुक्यात सुरेश धस ग्रामीण भागात प्रत्येक गावाचा दौरा करत असुन काल त्यांनी डोमरी,वैद्यकिन्ही,पारगाव घुमरा,सौताडा,पिंपळवंडी,देवी निमगांव,कडा आदी गावात जावून मतदार जनतेच्या गाठीभेटी घेतल्या काही ठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या याभागात त्यांच्या दौर्‍याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a comment