तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

सोलापुरात राज ठाकरे यांची जोरदार फटाके बाजी


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई : दि. 15 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे राज्यात सभा घेत आहेत. राज ठाकरे यांनी यापूर्वी नांदेड येथील सभेतून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर टीका केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसली, तरी भाजप विरोधात त्यांनी जोरदार फटकेबाजी करायला सुरवात केली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य रिंगणात आहेत. तिन्ही तगडे उमेदवार असल्याने सोलापुरातील लढत चुरशीची ठरली आहे. त्यात भाजपविरोधात प्रचारासाठी स्वत: राज ठाकरे सोलापूरच्या मैदानात उतरल्याने या लढतीला आणखी रंग चढणार आहे.
राज ठाकरे यांच्या सभेच्या खर्चाबाबत भाजपने उपस्थित केलेल्या प्रश्‍नावर बोलताना ठाकरे म्हणाले, सभेचा खर्च मोजण्यापेक्षा पाच वर्षात किती थाप्पा मारल्या त्या मोजा. आपल्या या सरकारने 4800 कोटी रुपये खर्च केला आहे. अणि एक दिवस अचानक आज रात 12 बजे नोटबंदी करून जवळजवळ 5 ते 6 कोटी नोकऱ्या गेल्या. त्यांचे परिवार रस्त्यावर आले. या सरकारने आरक्षण देण्याचे काम केले आहे पण सरकारी नोकरी राहिली नाही. पाच वर्ष या सरकारने दलित समाजाला खाली बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे पण आज पर्यंत ते सत्यात उतरवले नाही. पण मी म्हणतो जगातील लोक येऊन बाबासाहेब आंबेडकर यांची भव्यदिव्य लायब्ररी पाहण्यासाठी भारतात आले पाहिजे 1 लाख 20 हजार विहीरी बांधलात मग, दुष्काळ कसा?
सरकार जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतंय.
रशियाच्या वाटेवर देशाला नेण्याचं अमित शहा, नरेंद्र मोदींचा प्रयत्न.
भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास पत्रकार लिहू शकणार नाहीत.देशात राजीव गांधी यांच्यानंतर ३० वर्षांनंतर नरेंद्र मोदींना पूर्ण बहुमत मिळाले होते. पण, त्यांनी खोटे बोलून देशवासियांची फसवणूक केली आहे. देशात इतका वाईट पंतप्रधान मी आजवर पाहिला नव्हता, असे राज ठाकरे म्हणाले.कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीवेळीच मी सांगितले की, निवडणुकीपूर्वी हे युद्धही घडवू शकतात आणि तेच त्यांनी केलं.यावेळी राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या हरिसाल डिजिटल गावाच्या जाहिरातीवर सडकून टीका केली. हरीसाल डिजिटल गावाचं वास्तव आम्ही समोर आणल त्यावर मुख्यमंत्र्यांनी गाव डिजिटल झालंच आहे, असा दावा केला. पण सध्य स्थितीमध्ये या गावाची पोलखोल करत गावात ४ जी टॉवर नाही,एटीएम मशीन बंद आहेच शिवाय रोजच्या प्राथमिक गोष्टी देखील या गावात नसल्याचे राज ठाकरे यांनी पुन्हा व्हिडीओच्या माध्यमातून समोर आणले.
पुढे बोलताना राज ठाकरे यांनी हरिसाल डिजिटल गावाच्या जाहिरातीमधील लाभार्थी मॉडेल म्हणून ज्याने काम केले आहे, तोच सध्या रोजगाराच्या शोधात गाव सोडून निघून गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. एवढेच नाही तर या जाहिरातीमधील मॉडेल मुलगा मनोहर खडकेला राज ठाकरे यांनी स्टेजवर  हजर केला.
एवढयावरच न थांबता राज ठाकरे यांनी अजून एक गौप्यस्फोट करत, हरिसाल डिजिटल गावाची जाहिरात पण हरिसाल या गावात शूट केली नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ही संपूर्ण जाहिरात मुंबई शहराच्या आसपास तयार केली असल्याचे ते यावेळी म्हणाले. त्यामुळे हरिसाल डिजिटल गावाविषयी बोलताना पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारत का खोटं बोलताय मुख्यमंत्री? असे राज ठाकरे म्हणाले.

No comments:

Post a Comment