तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 April 2019

भारत सरकारच्या श्रम व रोजगार नाशिक विभागाच्या चेअरमन पदी वसंत मुंडे यांची निवडजनतेच्या जिव्हाळाच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे परळीतील वसंत मुंडे यांची भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालय कडून चेअरमन पदी निवड

कुशल व अकुशल कामगांरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर- नवनिर्वाचित चेअरमन वसंत मुंडे 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- केंद्रीय श्रम रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्डाच्या नाशिक विभागाच्या चेअरमन पदी वसंत संपतराव मुंडे यांची निवड करण्यात आली. यानिवडीबद्दल दि.05 मार्च 2019 ला जा.क्र.कू.16016/25/2002/443 अन्वये श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकारच्या या पत्राव्दारे नियुक्तीचे आदेश मिळाले.  या निवडीबद्दल वसंत मुंडे यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे. 

      याबाबत सविस्तर वृत्त असे की, परळी तालुक्यातील काँग्रेस नेते वसंत मुंडे यांची नुकतीच राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्डाच्या नाशिक विभागाच्या चेअरमनपदी भारत सरकार कडून निवड जाहीर झाली. वसंत मुंडे यांनी या आगोदर भारत सरकार व राज्य सरकारचे अनेक पदे भूषविले यामध्ये संचालक महाराष्ट्र ग्रामीण बँक, भारतीय दुरसंचार निगम लिमिटेड मंत्रालय सदस्य म्हणून व महाराष्ट्र शासन कृषक समाज संस्था संचालक, तृणधान्य तेलबिया व कडधान्य नियमनमुक्त समिती सदस्य व मराठवाडा विभागीय सहकारी संघ औरंगाबाद संचालक म्हणून पदावर काम केले आहे. सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्यांला न्याय देण्याचे काम, भारत सरकारच करू शकते हे दाखवून दिले. मुंडेंची श्रम व रोजगार मंत्रालयच्या नाशिक विभागाच्या चेअरमनपदी निवड झाली. त्यानी अत्यंत गरीब परिस्थितीतून मात करत समाजकारण करत असताना राजकीय या मोठ्या पदापर्यंत मजल मारली आहे.  त्याच्यावर ज्या विश्वासाने जबाबदारी दिलीत त्यास तडा जाऊ न देता, तो विश्वास सार्थ ठरवतील असा विश्वास आहे. तसेच त्यांनी जलयुक्त शिवार, रस्त्यांचा प्रश्न, पिक विमा योजनेचे प्रश्न, साखर कारखानादारीतील घोटाळे, रेल्वेचे प्रश्न, जनतेच्या जिव्हाळ्याचे विविध प्रश्न तसेच अनेक विषयां संदर्भात आवाज उठवून ते प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे.  या त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांच्या आणखी एक जबाबदारी सोपविली आहे. नाशिक प्रादेशिक संचालनाल्या अंतर्गत क्षेत्रात एकुण 11 जिल्हा आहेत. त्यामध्ये नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव, नंदुरबार, बीड, नांदेड, लातूर, हिंगोली, जालना, परभणी या जिल्हांचा समावेश आहे. श्रम व मंत्रालय, नाशिकच्या समितीवर एकुण 21 वेगवेगळ्या मार्गदर्शनासाठी तज्ञ संचालक असतात. या विभागाचे ध्येय धौरण नागरिकां पर्यंत पौहोंचविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही नवनिर्वाचित चेअरमन वसंत मुंडे यांनी दिली. 
   दरम्यान, विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रम राबवून सर्वांगीण विकासाची दिशा दाखविणे व जनजागृती निर्माण करुन स्वाभिमान व गुणवत्ता पुर्ण जिवन कुशल, व अकुशल कामगारांमध्ये विविध कार्यक्रम राबवून जनजागृती प्रशिक्षणाव्दारे करणे हा खरा उद्देश आहे.  वसंत मुंडे यांच्या निवडीने श्रम व रोजगार मंत्रालय, विभाग याला पुन्हा बळकटी निर्माण होणार आहे. श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकारच्या नाशिक विभाग पुन्हा एकदा जोमाने भरारी घेणार आहे  वसंत मुंडे यांच्या निवडीने पूर्ण महाराष्ट्र राज्यात श्रम व रोजगार मंत्रालय विभागात आनंदाचे वातावरण पसरले आहे. व त्यांच्या निवडीचे महाराष्ट्रातून, सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment