तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 April 2019

मंगरुळपीर शहरात अवतरली अयोध्यारुप रामाचे पाहु चला हो। नाम रामाचे घेवु चला हो!

जय श्रीराम जय जय श्रीराम नामचा गजर

फुलचंद भगत
मंगरुळपीर-श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव मंगरुळपीर नगरातील विविध मंदिरांमध्ये उत्साह आणि भक्तीभावात साजरा करण्यात आला. चैत्र महिन्यातील नवमी अर्थात राम नवमीला मंगरुळपीर नगरी श्री राममय झाली होती. अगदी पहाटेपासूनच रामजन्मोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली.श्री बिरबलनाथ मंदीर,कल्याणी चौकातील राम मंदीर,असावा राम मंदीर,श्री चारभुजानाथ मंदीर,राममंदिर, लक्ष्मी विहार काॅलनीमधील गजानन महाराज मंदीर,मठ मोहल्ला  सह सर्व मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच मुख्य चौक भगव्या पताका, ध्वज, तोरणे, श्रीरामचंद्रांच्या मोठ्या प्रतिमांना सजवण्यात आले होते.सकाळी मूर्तीला अभिषेक झाल्यानंतर होम-हवन करण्यात आले. त्यानंतर सकाळी १० ते १२ या कालावधीत भजन
किर्तनाला सुरुवात झाली. दु. १२ वाजता उपरोक्त
मंदीरातुन ‘चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती। दोन प्रहरी कां शिरी सूर्य थांबला, राम जन्मला सखे राम जन्मला ।। हे गीत रामायणातील स्वर कानी पडले. यासोबतच सर्व मंदिरांमध्ये गुलाल, सुंठवडा, फुले उधळून रामजन्माचे मनोभावे स्वागत करण्यात आले. 
रामजन्मानंतर पाळणा करण्यात आला. त्यानंतर सर्व भाविकांना काला, बुंदीचे लाडू, पेढे, सुंठ साखर असा प्रसाद वाटण्यात आला.हजारो भाविकांनी भजन किर्तन श्रवणाचा व प्रसादाचा लाभ घेतला.मंदीरात महाभिषेक, महाआरती, कीर्तन, रामजन्म, काला, प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. 
जागोजागी रामफळांची दुकाने थाटण्यात आली होती. रामफळ श्रीरामांना विशेष प्रिय आहे 

नृत्य व गायनात न्हाले नगर...

कल्याणी चौकातील राम मंदीर,असावा राम मंदिर,राजस्थानी चौकातील
श्री चारभुजानाथ मंदीरापासुन श्री रामजन्मानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा जात असताना फुले उधळून भाविकांनी तिचे स्वागत केले. शोभायात्रेत चित्ररथ, नर्तक, वादक असा ताफा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. फटाक्यांची आतषबाजी, भगवे ध्वज यामुळे बुडून जाय नगर सर्व नृत्यगायनी, सूर, रंग, ताल यांत मग्न मेदिनी डोलतसे तिही, जर शेष डोलला ।। या ओळींचा प्रत्यय आला. सर्वत्र उत्साह दिसत होता. सरबत, पिण्याचे पाणी भाविकांना वाटण्यात आले. मंदिरात गुढीपाडव्यापासूनच रामजन्मोत्सवाला सुरुवात झाली.दररोज सायंकाळी येथे भाविकांसाठी भजन, कीर्तन रामचरित मानस रामायणाचे आयोजन करण्यात आले. गत नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांची सांगता रामजन्माेत्सवाने झाली. सकाळी महाभिषेक केल्यानंतर मंदीरातील श्री राम, सीता लक्ष्मणाच्या मूर्तीला आकर्षक पोशाखाने सजवण्यात आले. तसेच फळे, पेढ्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment