तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 8 April 2019

परळी ही माझी, विकासात कुठेही कमी पडणार नाही शिवाजीनगरच्या विराट सभेत ना.पंकजाताई मुंडे यांनी दिला विश्वास


न.प.तील विजयाचा अहंकार बाळगणार्‍या राष्ट्रवादीला यापुढे कधीच गुलाल लागणार नाही


परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) :- परळी ही माझी आहे, इथल्या जनतेला चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात असे मला मनापासून वाटते पण पालिका ताब्यात नसल्याने कांहीच करता येत नाही तरीही शहरातील रस्त्यांसाठी मी 25 कोटीचा निधी दिला, भविष्यात विकासासाठी मी कुठेच कमी पडणार नाही असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिला. दरम्यान, नगरपालिकेतील विजयाचा अहंकार बाळगणार्‍या राष्ट्रवादीचा हा शेवटचा विजय आहे.  त्यांना या पुढे कधीच गुलाल लागणार नाही अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला.
बीड लोकसभेच्या भाजप-शिवसेना-रिपाइं- रासप- रयत क्रांती महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ शिवाजीनगर येथे शिवाजीनगर- नागसेननगर- आंबेडकरनगर- अशोकनगर- ईराणी वस्ती या भागाची संयुक्त जाहीर सभा झाली. या विराट सभेला संबोधित करताना ना. मुंडे म्हणाल्या की, आम्ही भगिनींनी  जिल्ह्याच्या आणि परळी शहराच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या आहेत. पाणी टंचाईच्या काळात खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी मागेल तिथे बोअर देवून महिला भगिनींना मोठा आधार दिला.  पालिका ताब्यात नसतानाही आम्ही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देत नाहीत.  वैद्यनाथ मंदिराच्या विकासासाठी 133 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध केला असुन या महत्वाकांक्षी योजनेचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सांगुन विकासासाठी मी  निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. मला बदनाम करण्यासाठी परळी-अंबाजोगाई रस्त्याचे राजकारण केले जाते. तो रस्ता पुर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करीत असुन धुळीचा त्रास दसर्‍यानंतर बंद होईल असे सांगुन या कामाबद्दल मला ही खंत वाटते असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांवर चौफर टीकेची झोड उठवली. इंग्रजांनी देश  उभा फाडला मात्र राष्ट्रवादीवाले आडवाही फाडीत आहेत. जातीपातीच्या भिंती उभ्या करून समाजामध्ये विषाची पेरणी करण्याचे पाप ते  करीत आहेत. मात्र जनता त्यांना थारा देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जादूची कांडी आणखी फिरवणार 
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जादूची कांडी माझ्याकडे आहे. याची आता प्रचिती विरोधकांना येत आहे. निवडणुक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यात प्रवेश करतानाच मी शिवसंग्रामचे तीन जिल्हा परिषद सदस्य भाजपात घेतले. त्यानंतर परळीचं सुसंस्कृत नेतृत्व राजेश देशमुख यांना भाजपाच्या व्यासपीठावर आणले. एवढेच नाही तर राष्ट्रवादीचे विधानसभेतील उपनेते आ.जयदत्त क्षीरसागर यांचाही पाठींबा घेतला. राष्ट्रवादी आता पुर्णपणे खिळखिळी झाली आहे. त्यामुळे त्यांची सर्व यंत्रणा कोलमडून पडल्याचे दिसत आहे. देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे ही सामान्य जनतेची इच्छा असुन त्यासाठी आपण डॉ.प्रितमताई मुंडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी केले. 
डॉ. प्रितमताई मुंडे यांनी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे निर्माण केले असुन परळी-बीड-नगर रेल्वेच्या कामालाही गती दिली आहे. एक महिन्यात रेल्वे बीडपर्यंत येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विकासाच्या मागे उभे रहा- राजेश देशमुख
ना.पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी कधीही जातीभेद केला नाही. विकास हीच जात समजून त्यांनी काम केले. सबका साथ सबका विकास या प्रमाणे त्यांनी सर्वाना विकासाच्या प्रवाहात सामावून घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यातही त्यांनी पुढाकार घेवून मोठे योगदान दिले. जातीपातीच्या राजकारणाला त्यांनी कधीच थारा दिला नाही त्यामुळे विकासासाठी जनतेने खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांना परळीची लेक समजून मताधिक्य द्यावे असे आवाहन भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख यांनी केले.
भूलथापांना बळी पडू नका- धम्मानंद मुंडे
राष्ट्रवादीवाले खोटे बोल पण रेटून बोल या पध्दतीने काम करतात. खरे जातीयवादी तेच असुन त्यांना विकासाशी नव्हे तर भ्रष्टाचाराशी देणेघेणे आहे. त्यांनी परळी पुर्णपणे भकास केली असुन विकासासाठी आलेला निधी खिशात घातला आहे. ते आता जातीजातीत विष पेरण्याचे काम करणार असुन त्यांच्या भूलथापांना बळी न पडता खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांना मताधिक्याने विजयी करा असे आवाहन रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष धम्मानंद मुंडे यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर दत्ताप्पा ईटके, विकासराव डुबे, जुगलकिशोर लोहिया, अशोक जैन, प्रकाश सामत, विजय वाकेकर, दिलीप बिडगर, पवन मुंडे, भोजराज पालिवाल, राजाभैय्या पांडे, रविंद्र परदेशी, सतीश जगताप, भाऊराव भोयटे, रमेश पाटील, उमेश खाडे, नरसिंग सिरसाट, विठ्ठल दंदे, प्रा. संपत वाघमोडे, बालासाहेब गित्ते, समंंदरखान पठाण, ए.जी. चव्हाण, राजेंद्र ओझा, बाबुराव पवार, सचिन गित्ते, मोहन जोशी, अनिश अग्रवाल, पवन मोदाणी, नितीन समशेट्टी, बंडू कोेरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रल्हाद सुरवसे, खंडू उजगरे, राहुल वडमारे, बंडू लांडगे, गणेश फड, किशन बुंदेले,  शिवा तरोडे, गौतम शिंदे,  चंद्रमणी  घुमरे, व्यंकटराव मुळे, भगवान बनसोडे, संजय आडसकर,  अमोल मुंडे, बळीराम लोंढे, लिंबाजी सुरवसे  आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन सुनिल कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत कराड यांनी केले.

No comments:

Post a Comment