तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 April 2019

देशाच्या लोकशाहीसाठी मतदार दूत म्हणून काम करणार भावी मतदारांचा निर्धार


प्रतिनिधी
मानवत:-मतदान हा लोकशाहिचा प्राण असून लोकसभा निवडणूकित मतदानाचा टक्का वाढविन्यासाठी आम्ही देशाच्या लोकशाहीसाठी मतदार दूत म्हणून काम करणार असल्याचा निर्धार भावी मतदार यांनी  केला.शहरातील के.के.एम.महाविद्यालयात( दी.12 )  भारत निवडणूक अयोगाच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथकाच्या माध्यमातून नवमतदार व भावी मतदार यांच्यासाठी परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य भास्कर मुंडे, उपप्राचार्य टी.व्ही. मुंडे, स्वीप पथक प्रमुख हनुमंत हंबिर, प्रवीण वायकोस, प्रेमेंद्र भावसार, रामप्रसाद अवचार, प्रा.ए. व्ही. देशमाने, प्रा.निर्मला पवार, प्रा.डी. ए. खोब्रागड़े, प्रा.ए. एस. घुगे आदिंची उपस्थिती होती. यावेळी स्वीपची भूमिका प्रेमेंद्र भावसार  यांनी प्रास्ताविकातुन विषद केली. प्रवीण वायकोस यांनी विनोदी भूमिकेतुन एका मताचे महत्व,   मशीनयंत्र, मतदार दूत आदि बाबतीत माहिती सांगितली.तर हंबिर यांनी प्रश्नोंत्तरातुन विद्यार्थ्यांच्या मनातील शंकाचे निरसन केले. रामप्रसाद  अवचार यांनी दिव्यांग मतदार ,जेष्ठनागरिक यांना मतदान केंद्रावर  स्वयंसेवक मतदार दूत यांनी सहकार्य करायचे आहे आणि स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तिसह इतरानाही मतदान करण्यासाठी प्रयत्न करा आणि मतदानाचा टक्का वाढवून लोकशाही मजबूत करा असे सांगून विद्यार्थ्यांना शपथ दिली. यावेळी लोकशाहीसाठी  मतदार दूत म्हणून सक्षम भूमिका बजावनार असल्याचे भावी मतदारांनी निर्धार केला. यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या.

No comments:

Post a Comment