तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 April 2019

मरणोत्तरही गोपीनाथ मुंडेंवरचे प्रेम कमीच होईना, शहानवाज हुसैन राष्ट्रीय प्रवक्त्याचे गोपीनाथ गडावर फोटोशेसन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांची परम ख्याती केवळ महाराष्ट्रापुरती नव्हती तर देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग होता.वर्तमानकाळात त्यांचा फोटो जरी समोर आला तरी ऱ्हदय कळवळुन येते. राष्ट्रीय राजकारणात स्थिरावल्यानंतर जोडलेली माणसं मरणोत्तरही कशी प्रेम करतात? हा अनुभव परवाच आला.भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाज हुसैन निवडणुक प्रचारासाठी परळीत आले तेव्हा गोपीनाथ गडावर हेलिकॉप्टरने उतरलेल्या हुसैन यांनी गोपीनाथ गड गाठले. समाधीस्थळाचं दर्शन घेताना पाणावलेले डोळे आणि मनाची स्तब्धता बोलका भावस्पर्श बरंच काही सांगणारा होता. प्रत्येक फोटोच्या समोर जावुन त्याचं बारकाईनं निरीक्षण आणि पुतळ्यासमोर उभा राहुन फोटोसेशन केले.मरणोत्तरही साहेबावरचं प्रेम कमीच होवु शकत नाही असं जीवाला वेड लावण्ाारा हा नेता होता.हे त्यांच्या कृतीतुन दिसले.
 लोकसभा निवडणुक प्रचारार्थ ते परळीला येताना गोपीनाथ गडावर हेलिकॉप्टरद्वारा उतरले. हेलिकॉप्टर लॅंडिंग होत असतानाच त्यांनी गोपीनाथ गडाची पाहणी केली. लॅंडिंग झाल्याबरोबर त्यांनी समाधीस्थळ गाठले. तब्बल पंधरा वर्षे एकमेकांच्या सहवासात असल्याने प्रत्येक आठवणीला उजाळा त्यांनी दिला.हुसैन जेव्हा मुंडे साहेबांच्या समाधीस्थळावर नतमस्तक झाले तेव्हा 36 सेकंद त्यांनी आपला ऱ्हदयभाव समर्पित करून दर्शन घेतले. गडाच्या चौभाऱ्यात मुंडे साहेबांची भव्य प्रतिमा आहे. तिथे स्वत: हुसैन यांनी जावुन पहाणी केली.त्यावेळी काही सुचना केल्या. जणुकाही मुंडे साहेब साक्षात समोर उभा राहिले अशा प्रकारचा मनाचा भाव तयार झाला आणि मग प्रत्येक फोटोला सुचना केल्या.बाहेर मुंडे साहेबांचा भव्य पुतळा आहे. त्या ठिकाणी स्वत: उभा राहुन निरीक्षण केले. काही फोटोसेशन केले. त्यांच्या मनातली घालमेल सहन होत नव्हती. कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. पी. एस. के. दिक्षीतुलू  व पत्रकार राम कुलकर्णी दोघांची उपस्थिती होती. अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. मुंडे साहेब असताना मी परळीला आलो होतो हाही प्रसंग त्यांना आठवला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की, मरणोत्तर आजही साहेबांचा चेहरा डोळ्यासमोरून जाता जात नाही.मात्र देशाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं कशी होती?आणि आजही त्यांच्या ऱ्हदयी असलेला भाव किती ऋणानुबंध जपणारा होता?अशा प्रसंगातुन लक्षात येते. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या विजयासाठी साहेबांवर प्रेम करणाऱ्या अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केलेलं सहकार्य नोंद घेण्यासारखंच आहे. माणसाचं कर्तृत्व किती मोठं असतं?ते वरचेवर प्रसंगानुसार दिसुन येतं. डोंगराएवढी कामगिरी या बीड जिल्ह्याच्या लाडक्या सुपुत्राने हयात असताना करून ठेवली. जीवाला वेड लावणारा आणि मरणोत्तरही ते वेड कायम ठेवणारा ऐसा नेता पुन्हा होणे नाही अशीच परिस्थिती आहे. मंत्री पंकजाताई यांच्यावर लोक जीवापाड प्रेम करतात. या कारणामागे अनेकांना पंकजाताईच्या चेहऱ्यात साहेबांचा चेहरा दिसतो. म्हणुन लेकीला पाठबळ देण्यासाठी जिल्ह्यात अठरापगड जातीधर्माचे लोक पुढे येतात. गोपीनाथराव मुंडे हे नेतृत्व असं होतं ज्यांच्या अंगी दैवत्वाचे गुण होतेच म्हणुन मंदिरात मुर्ती जिवंत कधी दिसत नाही. पण भाविक भक्तांचा भाव आणि त्यांची निष्ठा जीवापाड असते. तसंच आज म्हणावं लागेल. साहेब दिसत नसले तरी त्यांना ज्यांनी पाहिलं ते लोक मंदिरातल्या देवासारखी मनोभावे धरून निष्ठा ठेवतात हे मात्र नक्की.

No comments:

Post a comment