तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 30 April 2019

मिरवटच्या चारा छावनीमुळे परळी तालुक्यातील पशुधन वाचले-फुलचंद कराड

महादेव गित्ते
--------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील मिरवट येथे तुळशीराम पवार यांनी सुरू केलेल्या एकमेव चारा छावनीमुळे परळी तालुक्यातील पशुधन बाजारात जाण्यापासुन वाचले असुन ही चारा छावनी पशुपालक शेतकर्यांसाठी वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजपाचे जेष्ठ नेते फुलचंद कराड यांनी केले.
 तालुक्यातील मिरवट येथे सुरू असलेल्या चारा छावनीस भगवान सेनेचे सरसेनापती तथा भाजपाचे जेष्ठ नेते फुलचंद कराड यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी या चारा छावनीत असलेल्या 450 जनावरांची पहाणी केली या चारा छावनीत जनावरांना चारा व पाणी मुबलक मिळत असल्याने या चारा छावनीत असलेल्या जनावरांना दुष्काळी झळा कमी बसत आहेत तर शेतकर्यांचे चारा व पाण्यासाठीचे लाखो रुपये वाचले आहेत.सध्या परळी तालुक्यात भिषण दुष्काळ पडलेला आहे परळी तालुक्यात ही परिस्थिती पहाता आणखी चारा छावन्यांची गरज असल्याचे यावेळी फुलचंद कराड यांनी सांगीतले. याप्रसंगी फुलचंद कराड यांचा छावनीत पशुधन आणलेल्या मिरवट,मरळवाडी,नंदागौळ,सारडगाव,मांडवा,       चांदापुर,वसंतनगर,धारावती आदी गावातील शेतकर्यांनी सत्कार केला यावेळी त्यांच्या समवेत छावनीचालक तुळशीराम पवार,संदिपान आंधळे,सुग्रीव नागरगोजे,कल्पेश गर्जे,प्रशांत कराड आदी उपस्थित होते.

No comments:

Post a comment