तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 5 April 2019

तात्या गिराम यांचे अपघाती निधनपाथरी:-येथील स्व नितिन कला व विज्ञान महाविद्यालयात लिपिक  म्हणून कार्यरत असलेले तात्या आश्रेबा गिराम  वय  ४० हे पाथरी शहरातील बांदरवाडा  रस्त्यात बुधवार ३ एप्रिल रोजी सायंकाळी अपघातात डोक्याला मार लागल्याने  गंभिर जखमी झाले होते.त्यांना पुढील उपचारा साठी नांदेड  येथे हलवण्यात आले होते.मात्र उपचार सुरू असतानांच गुरूवारी रात्री त्यांचे निधन झाले.गिराम हे अतिषय मनमिळाऊ, कर्तव्य कठोर पण मितभाषी म्हणून ते सर्व मित्र परिवारात परिचित होते. गिराम यांच्या अकाली निधनाने त्यांच्या परिवाराची  मोठी हानी  झाली असून त्यांच्याव शुक्रवार ५ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता बाभळगाव येथे अंत्य संस्कार करण्यात आले या वेळी स्व नितिन महाविद्यालयाचे अध्यक्ष माजी आ हरीभाऊ लहाणे, जि पचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे, माजी जि प सदस्य चक्रधरराव उगले, अनिलराव नखाते प्राचार्य डॉ राम फुन्ने, प्राध्यापक आणि समाजातील विविध स्तरातील मान्यवर अंत्यविधी साठी उपस्थित होते या वेळी त्यांना श्रधांजली अर्पण करण्यात आली. या नंतर स्व नितिन महाविद्यालयात ही शोक सभेचे आयोजन करून श्रध्दांजली वाहाण्यात आली.गिरीम यांच्या पश्चात आई, पत्नी,दोन लहान मुली, भाऊ भावजय ,पुतने असा मोठा परिवारीवार आहे.पाथरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन आशोकराव गिराो यांचे ते मावस बंधू होते.

No comments:

Post a Comment