तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 8 April 2019

ना.पंकजाताई मुंडे यांची मंगळवारी जिरेवाडी येथे जाहिर सभा


सभेस उपस्थित राहुन खा.डॉ.प्रितमताईंच्या विजयावर शिक्कामोर्तब करावे-रवि कांदे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- 
    बीड लोकसभेच्या भाजपा- शिवसेना- रिपाई - रासप-रयत क्रांती सेनेच्या उमेदवार खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रचारार्थ बीडच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांची मंगळवार दि.09 एप्रिल 2019 रोजी जिरेवाडी येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.  या सभेस नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन दबंग खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करावे असे आवाहन भाजपाचे गण प्रमुख रवि कांदे यांनी केले आहे. 
बीड जिल्ह्याच्या दबंग खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात कुठलाही भेदभाव न करता केंद्र सरकारचा विकास निधी खेचून आणला परळीत त्यांनी आपल्या फंडातुन अनेक रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला. तसेच विविध ठिकाणी शुध्द पाण्याचे अ‍ॅरो प्लॅन्ट उभे करुन परळीकरांना पाणी उपलब्ध करुन दिले आहे. त्यांच्या पर्यत्नाने परळी तालुक्यातुन चार राष्ट्रीय महामार्ग आणले. परळी-बीड-नगर रेल्वे मार्गासाठी भरीव काम करुन रेल्वेचे काम अंतिम टप्पयात आहे.  आरोग्य शिबीर, सामुदायिक विवाह सोहळाच्या माध्यमातुन सामाजिक उपक्रमांचा आदर्श निर्माण केला. अनेक गावातील शाळांचा कायापालट करुन सुज्ज इमारतीसाठी निधी उपलब्ध केला. यासह ग्रामिण भागात अनेक रस्ते होत आहेत. गावामध्ये अनेक ठिकाणी सभागृह उभे आहेत. तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांना जिल्हाभरातुन प्रचंड पाठिंबा मिळत आहे. आपल्या परळी तालुक्यातुन पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवार दि.09 एप्रिल रोजी जिरेवाडी येथे सायंकाळी 8 वाजता होत असलेल्या जाहिर सभेस उपस्थित राहावे असे आवाहन गण प्रमुख रवि बंकटराव कांदे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment