तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

सत्येमेव जयते वॉटरकप स्पर्धा जिंकायचीच ;लिंबूटा येथील तरुण -तरुणींचा वज्र निर्धार
दुष्काळावर मात करण्यासाठीचा संघर्ष  

परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- तालुक्यातील मौजे लिंबूटा ग्रामस्थांनी पानी फॉउंडेशन च्या वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून दुष्काळावर मात करण्या

चा निर्धार केला आहे.                                     वॉटर कप स्पर्धेचे तालुका समन्वयक रमेशराव शेप, प्रशिक्षक गोविंद आडगळे यांच्या उपस्थितीत    सोमवार दि. 08 एप्रिल रोजी मध्यरात्री 12.वा.शेत मालक बाबुराव धोंडिबा मुंडे यांच्या हस्ते नारळ फोडून या स्पर्धेतील बांध बंदिस्तीच्या कामाला मशालींच्या प्रकाशात आणि 'जल है तो कल है '...अशा विविध घोषणांच्या निनादात  प्रारंभ करण्यात आला.                                            दरम्यान,गावाला साततच्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. प्यायला पाणी नाही, पिकांना द्यायला विहिरी, बोरवेलमध्ये पानी नाही. परिणामी  शेतीतून उत्पन्न नाही, आशा अवसथेत  कुटुंबाचा गाढा ओढताना आपल्या पालकांना करावी लागणारी तारेवची कसरत,आईला पाण्यासाठीकरावे लागणारे कष्ट   पाहून 

      गावातील काही तरुणांनी गत वर्षीही या स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रयत्न केला होता.त्यांची तशी तळमळ होती. परंतु त्यांना ग्रामस्थांचा  फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेच   ते  तरुण आणि गावातील काही तरुण महिला कोणत्याही परिस्थतीत यावर्षी ही स्पर्धा जिंकायचीच या उद्देशाने झपाटले आहेत.  सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि काही ग्रामस्थांचा पाठिंबा मिळविण्यातही ते यशस्वी झाले आहेत. सर्वांच्या मदतीने उर्वरित ग्रामस्थांचा पाठिंबा मिळविण्यातही त्यांना निश्चितंच येस येणार आहे.संपूर्ण गाव सोबत घेऊन विहीर पुनर्भरण, नाला खोलीकरण, रुंदीकरण , परस बाग कामे, सिसिटी, डीप सिसिटी, नाडेप व इतर  कंपोस्ट खत, ठिबक सिंचन,मातीनाला बांध, वृक्ष लागवड, आदी कामे युद्धपातळीवर करून स्पर्धा जिंकण्याचा वज्र निर्धार गावातील तरुण -तरुणींनी केला आहे. स्पर्धेसाठी पैसा कमी पडत असेल तर त्यावरही सर्वांनी मिळून मात करण्याची मानसिक तयारी या तरुण -तरुणींनी केली आहे.  हळूहळू ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत आहे. एकदिवस सर्व गाव लवकरच एकत्र येऊन वॉटर कप स्पर्धेत सहभागी दिसणार आह      या श्रमदानात सौ. मीनाक्षी भागवत मुंडे, सौ. अर्चना निवृत्ती केकाण, सौ. सुलभा खुशाल कांबळे, सौ. छाया बालाजी बनसोडे, सौ. रेखा बबन मुळे, मनोज भारत मुंडे, राहूल सुदाम  मुंडे, गौतम वैजनाथ बनसोडे, बबन मुळे, आदित्य सायास होळबे, सखाराम हरीभाऊ मुंडे, राजेभाऊ धनराज मुंडे, रोहित भागवत मुंडे, भागवत  धोंडिबा मुंडे, संत गाडगे महाराज सेवाभावी संस्थेचे सचिव अशोक मुंडे आदी उपस्थित होते. दररोज 25 ते 30 महिला  व  पुरुष श्रम यज्ञात सहभाग देत आहेत.

No comments:

Post a Comment