तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 16 April 2019

देशाला बलशाली व सक्षम बनविण्‍यासाठी नरेंद्रभाई मोदी हा एकमेव पर्याय – सुधीर मुनगंटीवार


लोहा, अहमदपुर आणि सिडको नांदेड येथे जाहीर सभा
नांदेड
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी गेल्‍या पाच वर्षात देशाचा चेहरामोहरा बदलविला आहे. शेतकरी, शेतमजुर यांच्‍यासह समाजातील सर्वच घटकांना विविध लोककल्‍याणकारी योजनांच्‍या माध्‍यमातुन दिलासा देत देशाला प्रगतिपथावर नेण्‍याचे काम नरेंद्रभाईंनी केले आहे. या देशाला बलशाली व सक्षम बनविण्‍यासाठी नरेंद्रभाई मोदी हा एकमेव पर्याय आहे. पुन्‍हा एकदा मोदी सरकार देशात सत्‍तारुढ होण्‍यासाठी भाजपा-शिवसेना-रिपाई (आ)-रासप महायुतीच्‍या उमेदवारांना प्रचंड मताधिक्‍याने विजयी करण्‍याचे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दि. 15 एप्रिल रोजी लातुर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्री. सुधाकर श्रृंगारे यांच्‍या प्रचारार्थ नांदेड जिल्‍हयातील लोहा व लातुर जिल्‍हयातील अहमदपुर येथील सभांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबोधित केले तर नांदेड मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्‍या प्रचारार्थ सिडको नांदेड येथे सभेला अर्थमंत्र्यांनी संबोधित केले. यावेळी कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचीही उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment