तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

भाजप मध्ये राहायचे किंवा नाही ? फुलचंद कराड घेणार १३ एप्रिल ला निर्णय

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
भारतीय जनता पार्टी माझा आत्मा आहे, गोपीनाथराव मुंडे माझा श्वास आहे. परंतु या पक्षातून मला व माझ्या कार्यकर्त्यांना सम्नानाची वागणूक तर मिळताच नाही परंतु त्यांना दूर करण्याचे काम केले जात आहे. अशा परिस्थितीत पक्षात राहून स्वतःची घुसमट करण्यापेक्षा इतर पक्षात जाण्याचा विचार केला असता मला पक्ष प्रवेशापासून वंचित ठेवले गेले व आपण एकत्र बसून चांगला निर्णय घेवूत अशी सूचना केली. परंतु मागील १५ दिवसांत कोणतीही चर्चा माझ्यासोबत झालेली नसल्याने कार्यकर्ते नाराज असून भाजप मध्ये राहायचे किंवा नाही याचा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे कार्यकर्ते म्हणतात. या पार्श्वभूमीवर १३ एप्रिल ला भगवान सेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल अशी घोषणा भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांनी केली. 
      भगवान सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज कराड यांच्या कार्यालयात पार पडली. यावेळी फुलचंद कराड यांनी कार्यकर्त्यांची मनोगते ऐकून घेतली. पांगरी च्या एका कार्यक्रमात मी जुन्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या, त्यांची नाराजी दूर करा अशी विनंती ना.पंकजाताईं मुंडे यांना केली होती परंतु ताईंनी नाराजी दूर न करता ज्यांना जायचे त्यांना जाऊद्या असा पवित्रा घेतला. मी अनेकदा अपमानाचे घोट गिळून गप्प बसलो, वेगवेगळ्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारात सहभागी झालो, पक्षाबाबत नाराजी वाढत असतानाही दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावर प्रेम असल्यामुळे दोन्ही ताईंच्या प्रचारात सक्रियपणे सहभागी झालो. मध्यंतरी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्यामाध्यमातून बैठकही ठरली होती, परंतु अद्यापही अशी बैठक  झाली नसल्याचे फुलचंद कराड यांनी सांगितले. 
       पक्षाकडून, नेतृत्वाकडून सन्मान व जबाबदारीचे काम मिळत नसल्याने मी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलो असता माझा हजारो कार्यकर्त्यांसह १६ मार्चला शिवसेना पक्ष प्रवेश निश्चित करण्यात आला होता. तेथेही मला अडचण निर्माण करून पक्ष प्रवेश थांबविला गेल्याचे कराड म्हणाले. पक्षात काम करू द्यायचे नाही आणि इतर पक्षात जाऊ द्यायचे नाही हि ना.पंकजाताई मुंडे यांची भूमिका माझ्यावर अन्याय करणारी आहे. 
मी शिवसेनेत जातोय एवढे कार्यकर्त्यांना कळले आणि १०० गाड्या भरून कार्यकर्ते मुंबई च्या मार्गावर उतरले होते. मुख्यमंत्री, ना. पंकजाताई मुंडे यांनी उद्धव ठाकरेंना माझा पक्षप्रवेश रद्द करा असे साकडे घातले परिणामी माझा पक्षप्रवेश थांबवला गेला. माझ्यासह अनेक जुन्या निष्ठावंतांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले असून त्यांना दूर करून पक्ष अडचणीत का आणत आहात ? असा सवाल फुलचंद कराड यांनी केला. केवळ  पक्षनिष्ठा आणि मुंडे परिवारावर नितांत श्रद्धा असल्याने आपण पक्षाशी बांधील आहोत. मला व माझ्यासारख्या जुन्या निष्ठावंतांना, भगवानसेनेच्या कार्यकर्त्यांना विचारात घेणार नसाल तर पक्षात राहणे किंवा बाहेर पडणे याचा निर्णय घेण्याची वेळ आल्याचे फुलचंद कराड यांनी सांगितले. आपण कार्यकर्त्यांच्या वाढत चाललेल्या नाराजीतून बैठक घेतली असून भाजप मध्ये राहायचे किंवा नाही याचा निर्णय शनिवार दि.१३ एप्रिल ला लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे दुपारी १.०० वा. होणाऱ्या मेळाव्यात घेतला जाणार असल्याचे फुलचंद कराड यांनी सांगितले. 
      आज झालेल्या बैठकीला देविदास कराड, माणिकराव सातभाई, पाटलोबा मुंडे, तौफिक सिद्दीकी, राधाकिशन पवार, संभाजी सोळंके, केशव बनसोडे, वैजनाथ राठोड, संदिपान आंधळे, प्रकाश राठोड, साहेबराव पवार, महादेव कराड, फुलचंद मुंडे, तानाजी गित्ते, नानासाहेब मुंडे, ज्ञानोबा फड, सायासराव फड, जनार्धन सोळंके, अजय बडे, हनुमंत गित्ते, वैजनाथ गित्ते, वैजनाथ मुंडे, बालाजी मुंडे, कल्पेश गर्जे, प्रशांत कराड, रवी कराड, भागवत दराडे, बंटी राठोड, सोनू गर्जे, रमेश राठोड, वैजनाथ राठोड, सुनील राठोड, अविनाश चव्हाण, नर्सिंग गायकवाड, भाऊसाहेब मुंडे, गोविंद कराड, बबन जाधव, रमेश चव्हाण, संतोष पवार, राधाकिशन पवार, सुंदर लव्हारे, निकेश बनसोडे, गणेश नागारोजे, प्रदीप नागरगोजे, संतोष गजमल, गोपाळ कांदे, संभाजी सातभाई, विजय नागरगोजे, भागवतराव मुंडे, विजय बडे, नानाभाऊ मुंडे, सचिन रणखांबे, प्रभू कराड, मुरलीधर मुंडे, रमेश राठोड यांच्या सह अन्य कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.

No comments:

Post a Comment