तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 1 April 2019

महावितरणकडुन एकाच महिन्यात सव्वा तीन कोटीची वसुली सरत्या आर्थिक वर्षात परळी विभाग बीड जिल्ह्यात अव्वल


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः-
परळी महावितरण विभागाकडुन मागील महिन्यात देण्यात आलेल्या उद्दिष्टा पेक्षा 180% अधिक वसुली करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीत ही परळी विभागातील जनतेने विज बिलाचा भरणा केला आहे. परळी महावितरण कार्यालयाच्या या उच्चांकी वसुलीमुळे परळी विभाग बीड जिल्ह्यातुन अव्वल आला आहे. 
महावितरण परळी विभागाला मार्च 2019 या महिन्यासाठी 1 कोटी 80 लाखांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितिन थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी उपविभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी वीज बिलाच्या वसुलीसाठी अथक परिश्रम घेतले. यासंदर्भात दि.18 मार्च रोजी सहाय्यक व्यवस्थापक नामदेव पवार, उपमुख्य औद्यगिक संबधीत अधिकारी बागुल, अधिक्षक अभियंता संजय सरग आदींनी परळी येथे महाविरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची बैठक घेऊन वीज बिल थकबाकी आणि वसुली बाबत सुचना करुन उद्दिष्टे दिले होते. यानंतर महावितरणच्या परळी येथील अधिकारी व कर्मचार्‍यांनी उद्दिष्टये पुर्ततेसाठी परिश्रम घेतले. यात परळी अर्बन विभागातुन 1 कोटी 80 लाख, परळी शहर विभागातुन 1 कोटी  10 लाख, सिरसाळा विभागातुन 12 लाख, परळी ग्रामिण मधुन 20 लाख, धर्मापुरी विभागातुन 3 लाख ऐवढी वीज बिलाची वसुली करण्यात आली आहे. ही वसुली उद्दिष्टापेक्षा 180 % अधिक असुन या वसुलीमुळे परळी उपविभाग बीड जिल्ह्यात अव्वल आला आहे. या वीज वसुलीसाठी कर्मचार्‍यांनी सुट्टीच्या दिवसात काम करुन थकबाकी दरांना वेगवेगळ्या सवलती व योजनांचा फायदा देत ही वसुली केली आहे.

No comments:

Post a Comment