तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 17 April 2019

मोदींना स्टेजवर भ्रष्ट्राचारी मंत्री आणि सैनिकांचा अवमान करणारे आमदार कसे चालतात ? - धनंजय मुंडे यांचा सवाल


जामखेड (प्रतिनिधी) :-  दि. 17 ---- न खाउगा ,
न खाने दुगा, म्हणणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःच्या व्यासपीठावर महाराष्ट्रातील भ्रष्ट्राचारी मंत्री आणि सैनिकांच्या पत्नीबद्दल अपशब्द बोलणारे आमदार कसे चालतात असा बोचरा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. 

राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे अहमदनगरचे उमेदवार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ आज जामखेड तालुक्यात खर्डा येथे सभेला श्री मुंडे संबोधित करत होते. 

आज अकलूज मध्ये झालेल्या भाजपाच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी मी भ्रष्ट्राचार होऊ दिला नाही असे वक्तव्य केले.  त्याचा समाचार घेतांना मुंडे म्हणाले की ,  पंतप्रधान  आज अकलूजमध्ये बेंबीच्या देठापासून सांगत होते, मी चौकीदार आहे. लोकांचा विश्वास कसा बसणार? कारण चौकीदाराच्या पाठीच तूरडाळीत २५०० कोटी लाटणारे मंत्री बसले होते, त्यांनीच दूध भुकटी प्रकल्पासाठीच्या अनुदानातही डल्ला मारला आहे गरीबांच्या तूरडाळीत डल्ला मारणाऱ्यांना, अनुदान लाटणाऱ्यांना चौकीदार मोदी कसे सहन करू शकतात? असा सवाल केला.

शहीद जवानांच्या नावावर मते मागणा-या पंतप्रधान मोदी यांचा आज अकलूज मध्ये जवानांच्या पत्नीबद्दल अपशब्द काढणारे भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  त्याचा ही धनंजय मुंडे यांनी समाचार घेताना सैनिकांच्या कुटुंबियांबद्दल अपशब्द बोलणार्‍यांना मोदी व्यासपीठावर कसे घेतात ?  याची लाज वाटत नाही का असा सवाल उपस्थित केला. 

 मोदी यांनी आजच्या सभेत जातीचा संदर्भ घेत मतदान करण्याचे आवाहन केले त्यावरही टीका करताना मुंडे म्हणाले की काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस जातीपातीचे राजकारण करत असल्याचा खोटा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. आणि आज त्यांच्याच पंतप्रधानाना स्वतःची जात काढून मत मागण्याची वेळ आली आहे. गडकरी साहेबांनी जातीवर राजकारण न करण्याचे सल्ले आधी आपल्या पक्षाला दिला पाहिजेत असा टोला ही लगावला.

खर्डा  गावाला निजाम काळातील लढ्याचा इतिहास आहे त्याचा संदर्भ घेत त्यावेळी निजामाला पराभूत केले आता या काळातील निजामशाही म्हणजे भाजपाच्या उमेदवारांना धूळ चारल्याशिवाय आपण शांत बसायचे नाही.  कुजय विरुद्धच्या या लढाईत संग्राम यांचा निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभेला मोठ्या संख्येने गर्दी झाली होती.

No comments:

Post a Comment