तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

पाथरी तालुक्यातील अंधापुरीत वादळी वा-यात विज कोसळुन दोन मेंढपाळांचा मृत्यू एकजन गंभिर जखमी;१० वर शेळ्या मेंढ्याही दगावल्याकिरण घुंबरे पाटील
पाथरी:-तालुक्यातील अंधापुरी गावात सोमवारी १५ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा ते सात च्या सुमारास शेतातील झाडाखाली शेळ्या मेंढ्यां सह थांबलेल्या तीघां पैकी दोघांचा वादळी वा-यात झाडावर वीज कोसळून  होरपळून मृत्यू झाला तर एकजन गंभीर रीत्या भाजला असून यात १० वर शेळ्या मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या असल्याची घटना ग्रामस्थांनी फोनवरून तेजन्यूज शी सांगितली.
आज सोमवार १५ एप्रिल रोजी सायंकाळी सहच्या सुमारास आकाशात ढगांची दाट गर्दी झालेली दिसून येत होती बीड जिल्ह्यातील  सुनवाडी ता धारूर येथील शेळी,मेंढी पालक असलेले  रामभाऊ साधू शिंदे वय ५०,बालू सिताराम काळे वय ३५ ते ४० कृष्णा रामभाऊ शिंदे वय १८,१९ हे गेली दिड महिण्या पासून अंधापुरी गावात शेळ्या मेंढ्या घेऊन राहात आहेत गावचे सरपंच चंद्रकांत सखाराम मोरे यांच्या शेतात हे शेळी,मेंढी पालक आपल्या शेळ्या मेंढ्या सह झाडा खाली थांबले होते दरम्यान सायंकाळी साडे सहा ते पावने सात च्या सुमारास.जोरदार वादळी वारे आणि विजांचा कडकडाट झाला याच वेळी एक विज हे मेंढपाळ थांबलेल्या झाडावर पडून यात १० वर शेळ्या मेंढ्या सह बालू सिताराम काळे आणि कृष्णा रामभाऊ शिंदे या दोघांचा जागीच होरपळून मृत्यू झाला असून रामभाऊ साधू शिंदे हे गंभिर रीत्या भाजले आहेत. हे ठिकाण गावच्या पुर्व दिशेला एक दिड किमी अंतरावर असून या विषयी गंभिर भाजलेल्या रामभाऊ शिंदे यांनी या विषयी सरपंच चंद्रकांत मोरे आणि पोलीस पाटील लक्ष्मणराव एखंडे यांना माहिती दिल्या नंतर गावातील गणेश कोल्हे, बळीराम मोरे अशोक महाडीक यांच्या सह दहा ते पंधरा जनांनी घटना स्थळी धाव घेतली या विषयी पाथरी पोलीसांना खबर देऊन जखमी रामभाऊ यांना उपचारा साठी दवाखाण्यात हलवले असल्याची माहिती या गावचे ग्रामस्थ गणेश कोल्हे यांनी फोन वरुन तेजन्यूज शी बोलतांना दिली.जखमी रामभाऊ यांच्या हाता पाया सह कंबरेला भाजले असल्याचे गणेश कोल्हे यांनी सांगितले.

No comments:

Post a comment