तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 8 April 2019

पवार साहेबा मुळे धनगर समाजाला आरक्षण मिळाले-प्रा.दळणर
प्रतिनिधी
पाथरी :- मी विद्यार्थी असताना शरद पवार साहेबांनी धनगर समाजाला आरक्षण दिल्या मुळेच धनगर समाजाची मुले शिकली नसता आम्हाला आमचा पारंपारिक व्यवसाय करावा लागला असता असे प्रतिपादन प्रा.शिवाजी दळणर यांनी खेडुळा व रेनाखळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार राजेश दादा विटेकर यांच्या प्रचार सभेत सोमवार ८ एप्रिल रोजी केले.
यावेळी आमदार बाबाजानी दुर्रानी,रॉ.काँ.ता अध्यक्ष एकनाथराव शिंदे,मुंजाजी भाले पाटील,चक्रधर उगले, दादासाहेब टेंगसे,अनिलराव नखाते,सदाशिव थोरात, राधाकिशन डुकरे,दत्तराव दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा.दळणर पुढे म्हणाले की जेव्हा मी विद्यार्थी होतो त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार हे होते त्यावेळेस त्यांनी धनगर समाजाला भटक्या  जमातीचे आरक्षण दिल्यामुळे आज धनगर समाजाचा शैक्षणिक व आर्थिक विकास झाला.आज आमच्या समाजाची अनेक मुलं शासनाच्या मोठ्या पदावर नोकरी करत आहेत. हे आज धनगर समाजाने विसरू नये,पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश दादा विटेकर यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. भाजप सरकार मागील पाच वर्षापासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यास का टाळाटाळ करते  असा सवालही त्यांनी सरकारला विचारला.धनगर समाजाने या लबाड सरकारच्या विरोधात मतदान करून आपल्या समाजाची ताकद दाखवावी असे  समाजाला आव्हान केले.
 यावेळी आमदार बाबाजानी दुर्राणी म्हणाले की पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांची लूट केली आहे. त्यावर परभणीच्या खासदारांनी संसदेत एकदाही प्रश्न उपस्थित केला नाही सभागृहात जिल्ह्याच्या खासदाराने प्रश्न उपस्थित केला असता तर आज आपल्यावर ही वेळ आली नसती त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार  राजेश विटेकर यांना विजयी करून निष्क्रिय खासदाराला धडा शिकवा असे ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी केले यावेळी खेडुळा व रेनाखळी येथील गावकरी प्रचार सभेस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment