तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 April 2019

स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांना श्रध्दांजली म्हणून डॉ.प्रितमला मतदान करणार-फुलचंद कराड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत मी मागील तीस वर्षात काम केले. भाजपाला गावात एजंट मिळत नसतांना आम्ही सायकलवर फिरुन भिंतीवर रंगरंगोटी करत प्रचार केला. स्व.मुंडे साहेबांनी आम्हाला राजकीय जीवनात भरभरुन दिले. स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या अकाली निधनामुळे माझा वनवास सुरु झाला मागील पाच वर्षात मी मान पान न बघता स्व.मुंडे साहेंबाच्या लेकीचे इमान इतबारे काम केले. परंतु मला कुठल्याच प्रक्रियेत विचारात घेतले जात नाही. अशा या परिस्थितीत ही स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांना श्रध्दांजली म्हणुन या लोकसभा निवडणुकीत डॉ.प्रितम मुंडे यांना मतदान करणार असल्याची भुमिका भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा भगवान सेनेचे सरसेनापती फुलंचद कराड यांनी आज भगवान सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात जाहिर केली. 

येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे आज दि.१३ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता भगवान सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्या आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास परळीसह बीड, लातुर, उस्मानाबाद, माजलगाव, दिंद्रुड, भगवानगड आदी भागातुन हजारों संख्येने कार्यकर्त्यांचे उपस्थिती होती. यावेळी आपली राजकीय भुमिका सादर करतांना  फुलचंद कराड यांनी मागील पाच वर्षात झालेल्या अन्यायाची सविस्तर पणे कैफियत मांडली.

स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या सोबत सुरुवाती पासुन राजकारणात असणारे फुलचंद कराड हे मागील तीन वर्षापासुन नाराज आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडुन सातत्याने अन्याय होत असल्याने या आगोदर कराड यांनी आ.विनायक मेटे यांची भेट घेऊन व त्यानंतर शिवसेनेच्या संपर्कात येऊन वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला होता. 

यानंतरही सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत कराड यांना कुठलेच स्थान न मिळाल्याने त्यांची नाराजी कायम या नाराजीतुन आज दि.१३ एप्रिल रोजी परळीतील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे भगवान सेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करुन आपली राजकीय भुमिका जाहिर करणार असल्याचे सांगितले. आज झालेल्या मेळाव्यात कराड यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाडा वाचला स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्यासाठी आपण भगवान सेनेच्या माध्यमातुन अविरत पणे काम केले. २० वर्षापुर्वी स्व.काकुंच्या पाठीशी असलेले भगवान भक्त स्व.मुंडे साहेबांच्या पाठीशी उभे करण्याचे काम केले. त्यांच्या विरोधात मी विधानसभा लढविली तरीही आमच्यात कुठलीही कटुता नव्हती २००९ साली स्व.गोपीनाथराव मुंडे अडचणीत असतांना मी पुन्हा भाजपा पक्ष प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी मला केंद्रातील महामंडळ, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष पद, साखर महासंघाचे संचालक करण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु त्यांच्या अकाली निधनामुळे माझे सर्वात मोठे नुकसान झाले. त्यांच्या पश्‍चात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडुन कायम अपमानास्पद वागणूक मिळत गेली. चुकीचे लोक सोबत भेटल्याने मला कायम डावलले गेले. साडेचार वर्ष हा अपमान मि सहन केल्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश घेणार हे कळल्यानंतर मुख्यमंत्री व ना.पंकजांनी माझा प्रवेश करु नका अशी विनंती केल्याने मला शिवसेना प्रवेश करता आला नाही. आशा या परिस्थितीत मी शांत होतो. कारण स्व.मुंडे साहेबांवर माझी नितांत श्रध्दा असल्याने. आज गोपीनाथ गड ज्या जागेवर उभा आहे. ती जागा माझी असुन माझ्या शैक्षणिक संस्थेच्या १० एकर जागेवर स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक उभे आहे याचा मला अभिमान वाटतो आणि त्यामुळेच मागील पाच वर्षापासुन मला राजकीय वनवासात पाठविले असले तरी या निवडणुकीत स्व.मुंडे यांना श्रध्दांजली म्हणुन डॉ.प्रितम मुंडे यांना एक वेळ मतदान करुन संधी देणार असल्याचे सांगितले. या मेळाव्यास अंबाजोगाई कारखान्याचे संचालक श्रीराम मुंडे, संदिपान आंधळे, देविदास कराड, भागवत मुंडे, संभाजी सोळंके, पोपटराव गर्जे, भैय्या जाधव, मुरलीधर मुंडे, प्रसाद कराड, तैफिक सिध्दीकी, फुलचंद मुंडे, अरुणराव दराडे, राधाकिश पवार, मच्छिंद्र बोबडे, भागवतराव दराडे, सहदेव कांदे, प्रशांत कराड, माऊली फड, गोविंद केकान, बंडू जट्टाळ, बालाजी मुंडे, महादेव कांदे, मुक्ताराम कराड आदिंची उपस्थिती होती. तर आभार प्रदर्शन रणखांब सर यांनी केले. मी उपाध्यक्ष असतो तर वैद्यनाथाची ही अवस्था झाली नसती 

स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी मला वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष केले. त्यावेळी ध्वजारोहन करण्याची संधी मला मिळाल्यानंतर त्याच दिवशी मी शेतकर्‍यांच्या ऊसाला दोनशे रु. वाढीव भाव व कर्मचार्‍यांना बोर्ड लागू करण्याची घोषणा केली. या घोषणेचे स्व.मुंडे यांनी कौतुक केले. परंतु मागील निवडणुकीत मी सर्वाधिक मताने निवडणुन आल्यानंतर दुसर्‍यास उपाध्यक्ष केले. यामुळे आज वैद्यनाथ कारखान्याची अवस्था गंभीर बनली आहे. मी उपाध्यक्ष असतो तर वैद्यनाथ कारखान्याची ही अवस्था झाली नसती असेही यावेळी कराड यांनी सांगितले. मेळाव्याचे सुयोग्य नियोजन व चोख व्यवस्था 

भगवान सेनेच्या या कार्यकर्ता मेळाव्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. श्रीराम नवमीचा कार्यक्रम असतांनाही सभागृह खचाखच भरले होते. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर अक्षरशाः हाऊस फुल झाले हेाते. रंग मंदिरा बाहेर एलईडीद्वारे लाईव्ह भाषणाची व्यवस्था करण्यात आली होती. समोर जमलेलेल्या आपल्या समर्थक कार्यकर्ते व मतदारांना फुलंचद कराड यांनी नतमस्तक होऊन लोटांगण घेत यापुढेही असेच आर्शीवाद पाठीशी राहु द्या असे आवाहन केले. या मेळाव्या नंतर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. आजच्या या मेळाव्या मुळे फुलचंद कराड यांचे राजकीय वजन पुन्हा सिध्द झाले. 

No comments:

Post a Comment