तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 28 April 2019

परळी तालुक्यातील हाळम येथील शेतकऱ्याची मुलगी पोलिस उपनिरीक्षकपदी निवड


महादेव गित्ते
------------------------------
परळी वैजनाथ (प्रतिनिधी): :-  डोळ्यातील स्वप्न  उराशी बाळगुन त्याच्या पुर्ततेसाठी कष्ट करण्याची तयारी असेल तर ध्येय निश्चित साध्य होते. हाळम ता.परळी येथील जीजाबाई पंडितराव दहिफळे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड केल्याने एका शेतकऱ्याच्या मुलीने इतर कोणताही आधार नसताना स्वतःच्या अपार मेहनतीने हे यश मिळवले आहे. 
 सध्या ठाणे पोलीस आयुक्तालय ,कार्यालयात पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असणाऱ्या जिजाबाई दहिफळे यांनी ग्रामीण भागातुन अतिशय धाडसाने ठाणे पोलीस दलात येथे शहरी भागातील स्पर्धक असताना २००९ मध्ये कॉन्स्टेबल पदाची परिक्षा उत्तीर्ण केली.
एवढयावरच न थांबता न थकता मनातील जिद्द स्वस्थ बसु देत  न०हती , २०१६ च्या खात्यांतर्गत पीएसआय परिक्षा दिली होती नुकतीच त्यांची लोकसेवा आयोगाने पीएसआय पदी निवड झाल्याचे जाहीर केल्याने त्याचे स्वप्न साकार झाले असुन माता पित्यांना धन्यता वाटत आहे.
हाळम गावातील सर्व ग्रामस्थांत अभिमान वाटत असुन , त्यांचे अभिनंदन होत आहे. ग्रामीण भागातील मुले/ मुली शहरी भागापेक्षा कमी नाही ही भावना वाढत आहे.

1 comment: