तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 April 2019

धनंजय मुंडेंच्या उद्या रविवारी नेकनुर पौळपिंपरी, सिरसाळा येथे जाहीर सभाशरद पवार साहेबां समवेत आष्टी येथे ही उपस्थित राहणार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि 13 -  बीड लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे   हे उद्या रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी बीड जिल्ह्यातील नेकनुर ,  पौळपिंपरी सिरसाळा येथे जाहीर सभा घेणार आहेत. आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या  सभेसही धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार आहेत

 राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले धनंजय मुंडे हे राज्यातील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झंझावाती दौरे करत आहेत.  त्याचबरोबर त्यांचे स्वतःच्या बीड जिल्ह्यातही तेवढेच लक्ष लागून राहिले आहे . राज्यात फिरतानाच बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी व्हावा यासाठीही त्यांनी कंबर कसली असून त्यासाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे.

 उद्या दिनांक 14 एप्रिल रोजी ही दिवसभरात जिल्ह्यातील तीन तालुक्यात एकूण चार सभा घेणार आहेत.  सकाळी 11 वाजता आष्टी येथे होणाऱ्या श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सभेला ते उपस्थित राहणार आहेत. 


दुपारी 3 वाजता बीड तालुक्यातील नेकनूर येथे त्यांची जाहीर सभा होणार असून सायंकाळी सहा वाजता परळी तालुक्यातील पोळ पिंपरी,  व रात्री आठ वाजता सिरसाळा येथील सभेस उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली.

No comments:

Post a Comment