तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

बजरंग बप्पा या शेतकरी पुत्राला संसदेत पाठवा प्रा.विजय मुंडे व प्रदीप मुंडे बंधूंचे आवाहन

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  ऐन निवडणुकीच्या काळात मतदारांची फसवणूक करणाऱ्या ना पंकजा मुंडे व खा प्रीतम मुंडे यांच्या खोटे आश्वासनाला बळी पडू नका शेतकऱ्याच्या पुत्र असलेल्या व आपल्या माय मातीची जाणीव असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना विजयी करा व संसदेत पाठवा असे आवाहन परळी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा विजय मुंडे व जि प सदस्य प्रदीप भैया मुंड या  मुंडे बंधूंनी  करून  भ्रष्ट राजकारण करणाऱ्या  मुंडे भगिनींच्या  भ्रष्टाचाराचे  पितळ  उघडे पडणार असल्याचा  निर्धार  केला 


         परळी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा विजय मुंडे व जि प सदस्य प्रदीप भैया मुंडे यांनी नागापूर जि प गटातील विविध गावांना भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला मोदी फडणवीस सरकारच्या अपयशाचा पाढा वाचतानाच प्रा विजय मुंडे यांनी अभ्यासपूर्ण मुद्देसूद व आक्रमक होऊन ना पंकजा मुंडे व खा डॉ प्रीतम मुंडे यांचा खोटारडेपणा उघडा केला स्वतःच्या जिल्ह्यातील व विधानसभा मतदारसंघातील विकासाची कामे करण्यात अपयशी ठरलेल्या या मुंडे भगिनी आता पुढे तरी काय दिवे लावणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा मुलगा असणाऱ्या बजरंग बप्पा सोनवणे यांना मत देऊ विजयी करा व कामाची संधी द्या असे आवाहन केले


      जि प सदस्य प्रदीप भैया मुंडे यांनीही जातीवादी भाजपापासून सावध राहण्याचा इशारा देऊन पुरोगामी विचाराच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले


       या संपर्क दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विष्णुपंत नाना देशमुख सुदाम राव देशमुख काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब देशमुख काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष ज्ञानोबा माऊली गडदे  तुकाराम कुकडे छत्रपती कावळे विलास कावळे आत्माराम नागरगोजे भागवत मुंडे मुक्ताराम देशमुख विजयमाला  घाडगे बाळासाहेब घाडगे तानाजी खडके श्री ढवाण अंगद गडदे रघुनाथ गडदे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल कांदे युवक काँग्रेसचे तालुका सरचिटणीस अनंत सलगर धनंजय कावळे पांडुरंग सलगर जगदीश पाळवदे आदीसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्ष महाआघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment