तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 27 April 2019

प्रा.आत्माराम झिंजुर्डे यांना पीएच.डी प्रदान


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- तालुक्यातील मौजे कौठळी येथील रहिवाशी व शिरुर (का),  जि.बीड येथील कालिकादेवी कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा.आत्माराम शंकरराव झिंजुर्डे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी.प्रदान केली आहे. "डॉ.गंगाधर पानतावणे यांनी लिहिलेल्या प्रस्तावाना एक अभ्यास" या विषयावर त्यांनी विद्यापीठास शोध प्रबंध सादर केला होता. यासाठी औरंगाबाद येथील सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.ऋषीकेश कांबळे यांनी मार्गदर्शन केले होते. पीएच.डीच्या मौखिक परीक्षेसाठी इंदौर (म.प्र.) अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे बहिस्थ परीक्षक म्हणून डॉ.अनिल गजभिये व डॉ.बा.आं.म. विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाड्:मय विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.अशोक देशमाने होते. या यशाबद्दल आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव मा.आ.जयदत्त (आण्णा) क्षीरसागर, डॉ.भारतभुषण क्षीरसागर, प्राचार्या डॉ.दीपाताई क्षीरसागर, प्रशासक डॉ.आर.जी.मचाले, व्ही.एल.क्षीरसागर, एम.ए.राऊत, प्राचार्य व्ही.जी.काटे महाविद्यालयातील व इतर सहकारी तसेच प्रा.धम्मपाल घुबंरे, कौठळीचे सरपंच मधुकर झिंजुर्डे, उपसरपंच भालचंद्र गुंजकर, विजय शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार रानबा गायकवाड, परळी पत्रकार संघाचे अध्यक्ष धिरज जंगले, पत्रकार मोहन व्हावळे, पत्रकार धनंजय आढाव ,पत्रकार महादेव गित्ते,शशिकांत भद्रे,श्रीकांत भद्रे व इतर सहकारी आणि कर्मचार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले.  

No comments:

Post a comment