तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 3 April 2019

समीरची दुधगावकर भाजपातअमेरिका शिक्षित, नावाजलेलं युवा उद्योजक नेतृत्व समीर दुधगांवकर यांच्या 
राजकीय कारकिर्दीची सुरुवात.
युतीच्या जालना सभेत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष दानवे जी, संपर्कमंत्री लोणीकर साहेब आणि मंत्रिमंडळ सदस्य ह्यांच्या उपस्थितीत परभणीच्या समीरच्या राजकीय कारकिर्दीची दमदार सुरुवात...

मा.समीरभाऊ दुधगांवकर यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात भाजपासोबत*

नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी मुख्यमंत्रीपदाच्या नेतृत्वाकडे पाहून भारतीय जनता पक्षासोबत राजकारणात काम करण्याचा निर्णय समीरभाऊ दुधगांवकर यांनी घेतला हे आपल्याला माहितीच आहे.. 

 अमेरिकेत अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण घेऊन देशप्रेमाखातर परत आलेले व मागील काही वर्षात स्वत:चा उद्योग करत उद्योग क्षेत्राचे नेतृत्व केलेले असे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी उपाध्यक्ष समीरभाऊ दुधगांवकर!! यांच्या मागच्या काही वर्षातील परभणी, मराठवाडा क्षेत्रात व एवढे दिवस उद्योग क्षेत्रात वावरणारे समीर आता राजकीय क्षेत्रात पहिले पाऊल टाकत आहेत.

समीर यांच्यासारख्या उमद्या स्वकर्तुत्ववान व्यक्तीच्या पक्ष कार्य सुरुवातीचा कार्यक्रम जालना येथे काल 2 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री मा.बबनराव लोणीकर आणि मा.रावसाहेब दानवे यांच्या हस्ते  झाला. 

यावेळी राज्यमंत्री मा.अर्जुन खोतकर, केंद्रीय मंत्री मा.रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष मा.हरिभाऊ बागडे, संघटन मंत्री मा.भाऊसाहेब देशमुख, मातब्बर नेते विजय गव्हाणे, युवा नेते राहुल लोणीकर, परभणी भाजपा जिल्हा अध्यक्ष अभय चाटे, भाजपा प्रदेश कार्यकारणी निमंत्रीत सदस्य मा.प्रमोद वाकोडकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांनी पक्ष कार्य सुरुवात केली.

या वेळी समीर दुधगांवकर यांनी पक्षकार्य वाढीच्या मोबदल्यात अपेक्षा व्यक्त केली की मुख्यमंत्री महोदयांनी परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सात ते आठ प्रकल्प मंजूर करून द्यावे. मुख्यमंत्र्यांनी देखील यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

आतापर्यंतच्या समीर यांच्या संयमी वागणुकीतून आणि अमेरिकेपर्यंत तांत्रिक क्षेत्रात मारलेली मजल बघता त्यांच्या अंगी असलेली जिद्द व चिकाटी सर्वानाच माहिती झाली आहे... हेच गुण समीरच्या भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर आधारित सुरु केलेल्या राजकीय कामातून परभणी जिल्ह्यासाठी काहीतरी चांगले घडवतील अशी सगळीकडे चर्चा आहे...

आपलीच,
समीर दुधगांवकर टीम..
संक्षिप्त परिचय-
समीर दुधगांवकर परभणी

No comments:

Post a Comment