तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

धर्माबादेत प्रभातफेरी व पटनाट्याद्वारे मतदान जनजागृती.


धर्माबाद: ( तालुका प्रतिनिधी ) दिनांक १८ एप्रिल रोजी होणा-या लोकसभा निवडणूक अनुषंगाने नांदेड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नांदेडचे जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्‍लाळ तसेच धर्माबादचे तहसिलदार श्रीमती ज्‍योती चौहान यांच्‍या मार्गदर्शनानुसार धर्माबाद शहरात दि. १०/४/२०१९ रोजी सकाळी ७.३० वाजता स्विप अंतर्गत जनजागृतीसाठी धर्माबाद शहरातील गल्‍लीतून व प्रमूख रस्त्यातून प्रभातफेरी काढुन जनजागृती करण्‍यात आली.  
सदर प्रभातफेरीत जि.प.कें.प्रा.शा. बाळापूर, उर्दु प्रा.शा., कस्‍तुरबा गांधी बालिका विद्यालय व गुरूकूल विद्यालय या शाळांनी सहभाग घेतला. मागील लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेले बुथ क्र.१३६, १४०,१४३, १४४, १८१ व १८७ या भागातून प्रभातफेरी काढण्‍यात आली.  प्रभातफेरी पानसरे चौकात आल्‍यानंतर कें. प्रा.शा. बाळापूर व कस्‍तुरबा गांधी बालिका विद्यालय धर्माबाद येथील विद्यार्थ्‍यांनी मतदार जनजागृतीवरील नाटीका पथनाट्य सादर करुन कोणत्‍याही अमिशास बळी पडु नका, मतदान करुन लोकशाही बळकट करुया व मतदानाच्‍या दिवशी निवडणुक ओळखपत्र, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, पॅनकार्ड इ. ओळखपत्राद्वारे मतदान करता येईल तसेच मतदान सकाळी ७ वाजल्यापासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे असे सांगून उपस्थितांची मने जिंकली. सदर प्रभातफेरीत तालुका स्विप प्रमुख गटशिक्षणाधिकारी डॉ. डी.एस. मठपती, शिक्षण विस्तार अधिकारी एल. एन. गोडबोले,  केंद्रप्रमुख संतुकराव आंदेलवाड, एस. डी. धोंडगे, अरुण ऐनवाले व साईनाथ माळगे तसेच बाळापूर शाळेचे मुख्‍याध्‍यापक सलीम शेख,  स्‍काऊट गाईड विभाग प्रमुख पी. एल. गोपतवाड, जी. व्ही. गंगुलवार, श्रीमती चुडावकर मॅडम, युनूसअली तसेच बहुसंख्‍य शिक्षक, कर्मचारी, युवक-युवती व व्‍यापारी मतदार यांनी सहभाग घेतला व उपस्थितांनी मतदान करण्‍यासाठीची शपथ घेतली. याप्रसंगी पत्रकार जी. पी. मिसाळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सा. ना. भालेराव, संजय गैनवार, रुखमाजी भोगावार यांच्यासह अन्य नागरिकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment