तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 9 April 2019

या सरकारने राजर्षी शाहूंच्या रक्ताला फसवण्याचं काम केल:तीस वर्षात एक-,एक एक उद्योग आणला असता तर परभणीत हजारो तरूणांना रोजगार मिळाला असता-प्राचार्य शिवाजीराव दळणरप्रतिनिधी
पाथरी:-महाराष्ट्रात कुठल्याच जाती धर्माला या सरकारने न्याय दिला नाही प्रत्येकाची दिशाभुल या सरकारने केली.मुस्लिम, धनगर,आेबीसी,एससी,एसटी एवढचं काय पण ज्या छत्रपती राजर्षी शाहुचे रक्त असलेल्या मराठा समाजाने आरक्षणा साठी अगदी शांततेत रेकॉर्ड ब्रेक ५८ मुक मोर्चे काढले ४२ जनांनी बलीदान त्या शाहुंच्या रक्तालाही फसवण्याचं काम या सरकार ने केलं असल्याचा घणाघात प्राचार्य डॉ शिवाजीराव दळणर यांनी मंगळवारी ९ एप्रिल रोजी वाघाळा येथील राकाँ उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारा निमित्त बोलतांना केला.
या वेळी राकाँ जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुर्रानी, मुंजाजी भाले पाटील, अनिलराव नखाते, दादासाहेब टेंगसे, सुभाषराव कोल्हे,चक्रधरराव उगले, एकनाथराव शिंदे,अरुनराव कोल्हे, सदाशिव थोरात,साळवे, पटने दत्तू नागमोडे,डि बी मोकाशे,पदमाकर मोकाशे,गणेशराव घुंबरे ,बंटी पाटील घुंबरे ,विष्णू काळे,संदिप टेंगसे, कार्तिक घुंबरे आदींची या वेळी उपस्थिती होती. या वेळी पुढे बोलतांना प्राचार्य दळणर म्हणाले की, गेली तीस वर्ष आपण भावनेच्या भरात मतदान केले याचा गंभीर परीणाम जिल्ह्याला भोगावा लागला कारण या कार्यकाळात जिल्ह्यात प्रचंड असे दारीद्रय निर्माण झाले असल्याचे ही सांगुन शिवसेनेच्या प्रत्येक खासदाराने जर प्रत्येक वर्षी जिल्ह्या साठी एक उद्योग आणला असता तर आज जिल्ह्यातील हजारो बेरेजगारांना रोजगार उपलब्ध झाला असता असे ते म्हणाले केंद्रा कडे प्रचंड असा पैसा आहे त्यात जिल्ह्यात कृषी पुरक व्यवसाय आणून शेती मालाला चांगले दर मिळाले असते भावने मुळे  या गोष्टी कडे सोईस्कर पणे दुर्लक्ष करत जिल्ह्याची तिजोरी भरण्या एैवजी शिवसेनेच्या खासदारांनी स्वत:ची संपत्ती वाढवली असल्याचा आरोप ही या वेळी दळणर यांनी केला.हे सरकार म्हणाले होते संपुर्ण कर्ज मुक्ती करू,प्रत्येकाला पंधरा लाख रुपये देऊ, दर वर्षी शेतक-यांच्या पोरांना दोन कोटी नोक-या देऊ म्हणून मोठ्या आशेने आम्ही या लोकांना मागच्या वेळी केंद्रात आणि राज्यात संधी दिली मात्र यातलं या फसव्यांनी काहीच केलं नाही या उलट १४ हजार शेतक-यांनी आत्महात्या केल्याचे ही ते म्हणाले.ज्यांना भाकरी खायला भेटत नव्हती ते आज कोट्याधीश होऊन बसले ते केवळ आपण भावनिक होऊन केलेल्या मतदाना मुळेच असा आरोप ही या वेळी दळणर यांनी केला. धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणा-यांनी ते दिले नाही उलट खा शरद पवार १९८९ ला मुख्यमंत्री असतांना नाकपुर विधान भवनावर मोर्चा गेला तेव्हा त्यांनी धनगरांना ओबीसी तुन एन टीत आणले आणि आज हजारोच्या संखेत धनगरांची पोरं शिक्षणात,नौकरीत सवलती घेऊ शकले मात्र या सरकारने एन काढून एस लावण्याची मागणी पुर्ण न केल्याने राज्यातील सर्व धनगर समाजाच्या नेत्यांनी एकत्र येत मुंबई येथे बैठक घेऊन भाजप-सेनेला मतदान न करण्याचा ठराव केला असल्याने आता धनगर समाजाने या लोकांना मतदान न करण्याचे आवाहन करून विटेकरांना संधी द्या पवार साहेबांच्या मार्गदर्शनात नक्कीच जिल्ह्याचा विकास झाल्याशिवय राहाणार नाही असे प्राचार्य डॉ शिवाजीराव दळणर म्हणाले.
या वेळी आ बाबाजानी दुर्रांनी आणि माजी जि प सदस्य चक्रधरराव उगले यांनी ही भाषणे करून ग्रामपंचायत,पंचायत समिती जिल्हा परिषदेतील अनुभव गाठिशी असलेल्या भुमीपुत्र राजेश विटेकरांना संधी द्या विटेकर शिव शेजारी आहेत रोज भेटतील एकही मतदान वाया जाऊ देऊ नका परिवर्तनात सहभागी व्हा असे आवाहन या वेळी केले. या सभे साठी अभुतपुर्व हजारोच्या संखेत ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरीकांची उपस्थिती होती

No comments:

Post a Comment