तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 2 April 2019

वेदांतचार्य गुरुवर्य श्री.ह.भ.प. नथुराम बाबा केहाळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त दोन दिवसीय सोहळा संपन्न...


 जिंतूर..
जिंतूर तालुक्यातील जोगवाडा येथे नथुराम बाबा केहाळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवसीय सोहळा आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त दि.1रोजी श्री.ह.भ.प. भागवत महाराज वलखेडकर व दि.2 रोजी नामदेव महाराज ढवळे. (वारकरी शिक्षण संस्था चारठाणा.) यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तनामध्ये महाराजांनी वेदांतचार्य गुरुवर्य नथुराम बाबा केहाळकर यांच्या निष्काम भक्तीच्या आठवणींना उजाळा दिला.. संत कोणाला म्हणावे...? संताची व्याख्या काय...? निष्काम भक्ती म्हणजे काय..? या सर्व प्रश्नाचे उत्तर म्हणजे गुरुवर्य नथुराम बाबा.....
 अशा विविध आठवणींना महाराजांनी कीर्तनांमधून उजाळा दिला.‌. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी जोगवाडा यांच्याकडून नथुराम बाबा यांची कर्मभूमी असलेल्या श्री संत तुकाराम महाराज संस्थान जोगवाडा येथे करण्यात आले होते..

No comments:

Post a Comment