तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 1 April 2019

नांदेड-लातूर-मुंबई मंजुर असलेली गाडी का चालू करता आली नाही ? - वसंत मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  काँग्रेसच्या सरकारने रेल्वे मंत्री पवनकुमार बनसल यांनी भारत सरकारच्या रेल्वे बजेट मध्ये दि.20 मार्च 2013 ला गाडी क्रमांक 22108 नांदेड-परळी-लातूर-मुंबई व 22107 मुंबई-लातूर-परळी-नांदेड अशी गाडी मंजुर करण्यात आलेली आहे. ती गाडी आजतागायत बीड जिल्ह्याच्या दबंग खासदार यांना गेल्या पाच वर्षात देखील का सुरू करता आली नाही? असा खडा सवाल एका प्रसिद्ध पत्रकाव्दारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत मुंडे यांनी केला आहे.

  याबाबत प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रेल्वे मंत्री पवनकुमार बनसल यांनी भारत सरकारच्या रेल्वे बजेट मध्ये दि.20 मार्च 2013 ला गाडी क्रमांक 22108 नांदेड-परळी-लातूर-मुंबई व 22107 मुंबई-लातूर-परळी-नांदेड अशी गाडी मंजुर करण्यात आलेलीआहे. रेल्वे प्रशासनाने वेळापत्रक ही मंजूर केली होती. तरी आजतागायत मंजूर असलेली थेट मुंबई गाडी का चालु केली नाही हा खरा प्रश्न आहे. येथील लोकप्रतिनिधी  विकासाच्या नावाखाली नुसत्याच गप्पा मारत आहेत. अर्थसंकल्पात या गाडीची घोषणा होऊनही ही गाडी सुरू न झाल्याने याबाबत येथील नागरिकांना नाराजी व्यक्त केली आहे.  याबाबत अनेक वेळा निवेदन सादर करण्यात आली होती. यागाडी बाबत संबधीत विभागाला सुचना देखील दिल्या होत्या. तरी देखील गेल्या पाच वर्षीतील मोदींच्या सरकारात साधी मंजूर असलेल्या गाडी सुरू करता आली नाही ? तरीही जनतीची दिशाभूल करुन मतदान मागण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा विकासाच्या गप्पा मारणाऱ्या खासदारांना जनता घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.  परळीच्या प्रवाशांना लातूर-मुंबई गाडी पकडण्यासाठी लातूरला जावे लागते. तरी देखील गाडी सापडते का नाही अशी मनात साशंकताअसते. म्हणून प्रवांशाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खासदारच्या मनात सामान्य जनता वेडी रहावी म्हणून गाडी सोडायची नाही. त्यातच दोन वर्षापासून रखडलेल्या परळी-अंबाजोगाई रस्तामुळे परळीहुन लातुर-मुंबई गाडी पकडण्यासाठी  लातूरला जायला चार तास लागतात. म्हणून प्रवाशांची गैरसोय होत आहे. परळीहुन मुंबईला निघालेल्या प्रवाशांना लातुर-मुंबई गाडी सोईस्कर नसल्याने ही गाडी नांदेड-परळी-लातूर- मुंबई ही गाडी मंजुर असलेली तात्काळ सुरु करा. परळीच्या लोकप्रतिनिधीना परळीचे नागरिक सहजा सहजी मुंबईला येऊ नये असे वाटते की काय ?अशी शंकेची पाल जनतेच्या मनात चुकचुकल्या शिवाय राहत नाही. वसंत मुंडे यांनी खासदारावर रेल्वे न चालू केल्याचा असा आरोप केला की, परळी मतदारसंघातील नागरिक स्वातांचे प्रश्न घेऊन मंत्रालयात दाखल होतील आमचा भागाचा विकास करा म्हणतील, विविध प्रश्न घेऊन येतील ते प्रश्न सुटणार नाहीत. त्यावेळेस जनतेच्या मनात आक्रोश तयार होईल. या सरकारचे खरे स्वरूप नागरिकांना कळेल त्यावेळेस पदाधिकारी जास्तीत आज्ञानी, अडाणी ठेवण्याचा व जय करीत कोण मागे फिरवण्याचा म्हणून असा डाव लोकप्रतिनिधी आहे.असा आरोप काँग्रेस ज्येष्ठ नेते वसंत मुंडे यांनी केला आहे.

No comments:

Post a Comment