तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 April 2019

बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे यांनी पिंपरी बु. जिल्हा परिषद गट काढला पिंजुनपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि.14......... राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन कॉर्नर बैठका, प्रचार फेरी, मतदारांशी डोअर टु डोअर भेट घेऊन संवाद साधला. 

परळी तालुक्यामध्ये अजय मुंडे यांनी विविध गावांचा झंझावती दौरा करून मतदारांच्या भेटी घेतल्या. यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ त्यांच्या समवेत होते. त्यांनी पिंपरी बु., जिल्हा परिषद गटातील सेलू, रेवली, ममदापूर, हुडा कौडगांव, घोडा कौडगाव, नाथरा, पांगरी, इंजेगाव, साबळा कौडगाव, पौळ पिंपरी, आचार्य टाकळी, वडखेल, गाढे पिंपळगाव, देशमुख टाकळी, सबदराबाद, मलनाथपूर, वडखेल, परचुंडी, लिंबोटा आदी गावांना भेटी देऊन धनंजय मुंडेंचे हात बळकट करण्यासाठी बजरंग सोनवणे यांना गावा-गावातून प्रचंड मताधिक्य देऊन बहुमताने विजयी करा व बीड जिल्ह्याच्या विकासाकरीता शेतकरी पुत्राला दिल्लीत पाठवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. गावोगावी निघालेल्या प्रचार फेर्‍या, कॉर्नर बैठकांना मतदारांमधून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे.

 या दौर्‍यादरम्यान वाल्मिकअण्णा कराड, पं.स.सदस्य वसंत तिडके, कृ.उ.बा.समिती संचालक राजेभाऊ पौळ, रत्नाकर मुंडे, बाबासाहेब रूपनर, दिलीप कराड, अमोल कराड, श्रीनिवास मुंडे, माणिकराव पौळ, शिवाजी राठोड, प्रल्हाद गव्हाणे, बबन पौळ, बापुराव कोल्हे, दत्तात्रय पारेकर, राजेभाऊ गिराम, शिवाजी फपाळ, विकास फपाळ, शंकर कोचे, बळी कोळेकर, सुभाष राठोड, रावसाहेब राठोड, अर्जुन चव्हाण, अर्जुन गव्हाणे, बाळासाहेब गव्हाणे, शिवाजी गव्हाणे, शितलदास आरसुळे, राजेभाऊ राडकर, विकास सोनवणे, संतोष आचार्य, श्रीकृष्ण काकडे, सतिश आचार्य, उल्हास आचार्य, गोविंद कराड, संदिप दिवटे व आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment