तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

मतदार दूत हा लोकशाहिचा आधार- गटविकास अधिकारी धाबेआरूणा शर्मा पालम
देशाची लोकशाही मजबूत करायची असेल तर त्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी लागेल यासाठी भावी मतदार हा लोकशाहिचा आधार असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी एस. बी.धाबे यांनी केले. शहरातील ममता माध्यमिक विद्यालय येथे (दी.15) रोजी स्वीप पथका मार्फ़त नवमतदार व भावी मतदार यांच्याशी परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी आर. के.क्षीरसागर , तर प्रमुख पाहुने म्हणून गटविकास अधिकारी एस. बी.धाबे, स्वीप सदस्य हनुमंत हंबिर, प्रवीण वायकोस, प्रेमेंद्र भावसार, रामप्रसाद अवचार, सरकटे, सोपान कदम, शिवाजी अंबोरे, भगवान जाधव, भाऊसाहेब आवरगंड, आदिंची उपस्थिती होती.पुढे बोलताना गटविकास अधिकारी धाबे यांनी मतदान केंद्रावर दिव्यांग, वयोवृद्ध,व्यक्तिसाठी मतदान केंद्रा पर्यंत ने-आन करण्याची सुविधा केली आहे. तसेच स्वयंसेवक म्हणून विद्यार्थी नियुक्त केले आहेत.तेंव्हा भावी मतदार यांनी लोकशाहीसाठी मतदार दूत म्हणून प्रामाणिकपने काम करावे असे सांगितले. यावेळी रामप्रसाद अवचार व प्रेमेंद्र भावसार यांनी लघु नाटिका सादर केली.  हनुमंत हंबिर यांनी एका मताचे महत्व पटवून दिले. तर प्रवीण वायकोस यांनी विनोदी शैलीतुन मतदारदूत यांची भूमिका विषद केली.अध्यक्षीय समारोपातुन प्राचार्य क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन गोविंद पौळ तर आभार मोतीराम शिंदे यांनी मानले.

No comments:

Post a Comment