तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

बीड लोकसभेचे अपक्ष उमेदवार शेख जमीर बशीर यांचा शेकडो समर्थकासह ह.नासरजंग बाबा दर्गेस चादर चढवुन प्रचाराचा शुभारंभपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  नेहमी आपली सामाजिक कृती व बांधकाम कामगाराचा विविध पातळीवरुन आवाज उठवुन आपली वेगळी प्रतिमा निर्माण करणारे शेख जमीर बशीर यंदा ३९ बीड लोकसभा मतदार संघातुन अपक्ष म्हणुन निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्या अनुषंगाने  त्यानी आपल्या शेकडो समर्थकासह काल परळी येथील हजरत नासरजंग बाबा रह. दर्गा येथे फुलाची चादर चढवुन प्रचाराचा शुभारंभ केला.
या वेळी प्रतिक्रीया देताना शेख जमीर म्हणाले की बीड जिल्हा ही सुफी संताची भुमी,उसतोड कामगाराची मातृभुमी व शांतता,बंधुता व सामाजिक सलोख्याचा जिल्हा म्हणुन ओळखला जायचा परंतु मागील काही वर्षात इथल्या राजकीय लोकांनी स्वार्थापोटी व स्वताची राजकीय प्रसिध्दी साठी जिलह्याला एक वेगळीच छवी निर्माण करुन टाकली आहे व काही लोक आपसातले विरोध दर्शवुन सत्ता भोगत आहे आणि विकासाच्या नावे फक्त स्वताचे कार्यकर्त्याची गुत्तेदारी पोसण्यास यांना समाधान वाटत आहे आता हि परिस्थिती बदलायच्या उद्देशाने मी या निवडणुकीत अपक्ष म्हणुन उभा आहे व माझा चिन्ह दुर्बिन असुन नागरिकानी कोणत्याही भुलथापा व भावनिकतेच्या गप्पेला बळी ना पडता मला मतदान करण्याचे आवाहन शेख जमीर यांनी केले आहे. या वेळी
नसीब खान,तय्यब भाई, रमजान शेख, मधुकर मस्के, आचरे दादा ,सचिन मुंडे,युनूस भाई,केशव मुंडे, अकबर खान, अजहर खान, तोहीद शेख, रशीद पठाण ,मुजाहेद खुरेशी, शाकेर बाबा, इम्रान खान, अय्युब खान, हमीद भाई ,करीम भाई ,अमजद खान,नरसिंग मस्के, मोबीन खान, शेख सिराज भाई यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment