तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 14 April 2019

'वैद्यनाथ' ने ऊस उत्पादकांना दिली एफआरपी ची रक्कम ; राहिलेले ६०० रूपयेही बॅकेत वर्गसिरसाळ्याच्या सभेत शेतक-यांनी मानले ना. पंकजाताई मुंडे यांचे आभार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- दि. १४ ------ वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतक-यांना एफआरपी प्रमाणे रक्कम अदा केली असून राहिलेले ६०० रूपये देखील बॅकेत वर्ग केले आहेत, सोमवारी सर्व शेतक-यांना ही रक्कम मिळणार आहे. दरम्यान, काल सिरसाळा येथे झालेल्या सभेत ऊस उत्पादक शेतक-यांनी कारखान्याच्या अध्यक्षा तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांचे याबद्दल आभार मानले आहेत.

  सन २०१८ - १९ या गळीत हंगामात ४ लाख ३५ हजार मे.टन ऊसाचे गाळप झाले होते. गाळप झालेल्या ऊस उत्पादकांना वैद्यनाथ कारखान्याने प्रति टन एक हजार ४०० रूपयांचा पहिला हप्ता त्यांच्या बॅक खात्यात नुकताच जमा केला होता.  एफआरपी नुसार आणखी सहाशे रूपये म्हणजे एकूण दोन हजार रूपये शेतक-यांना द्यायचे होते. काल ना  पंकजाताई मुंडे यांनी याबाबत निर्णय घेऊन राहिलेली प्रति टन ६०० रूपयाची रक्कमही शेतक-यांच्या बॅक खात्यात जमा केली. उद्या सोमवारी संबंधित शेतक-यांना त्यांच्या खात्यातून ही रक्कम काढता येणार आहे. 

एक रूपयाही कपात न करता एफआरपी दिली ; शेतक-यांनी मानले आभार
------------------------
मागील तीन वर्षात एका मागोमाग एक नैसर्गिक संकटं कारखान्यावर आली होती त्यामुळे कारखान्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. असे असले तरी ना. पंकजाताई मुंडे हया ऊस उत्पादकांच्या पाठिशी नेहमीच खंबीरपणे उभा राहील्या. दुष्काळामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पुर्णपणे वाळून गेला होता, ना. पंकजाताई मुंडे यांनी नफा तोटा न बघता शेतक-यांचा संपूर्ण ऊस गाळप केला शिवाय एक रूपयाही कपात न करता एफआरपी ची रक्कम दिली, त्यामुळे आनंदित झालेल्या सिरसाळा, पांगरी, गाढे पिंपळगांव परिसरातील शेतक-यांनी सिरसाळा येथे सुरू असलेल्या प्रचार सभेत जाऊन ना. पंकजाताई मुंडे यांचा सत्कार केला व त्यांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment