तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 3 April 2019

भविष्याचा विचार करताना वर्तमानातील आनंद हरवु नका - भाऊसाहेब म. जोशीसुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. ३ ( प्रतिनिधी ) जीवन जगत असताना आपण भविष्याचाच विचार जास्त करतो व त्यामुळे वर्तमानातला मिळणारा आनंद गमावुन बसतो, म्हणून वर्तमानात जगायला शिका असे प्रतिपादन भागवताचार्य भाऊसाहेब महाराज जोशी यांनी केले.
       गेवराई शहरातील रूद्रेश्वर मंदिर येथे आयोजित भागवत ज्ञान यज्ञ सोहळ्यात कथेचे निरोपण करतांना ते बोलत होते. दिनांक ३० मार्च ते ५ एप्रिल २०१९ या कालावधीत रूद्रेश्वर सेवा मंडळ जायकवाडी वसाहत गेवराई यांच्या वतीने या भागवत ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. कथेचे निरोपण करताना भागवताचार्य भाऊसाहेब महाराज जोशी पुढे म्हणाले की, प्रपंचात आज माणसाचा लोभ वाढलेला आहे, संपत्तीसाठी आज देखील घरा घरात महाभारत होत आहे. पूर्वीच्या काळी युध्दात धर्म होता, आज धर्मात युध्द होऊ लागले आहे. प्रपंच्यात प्रभावी होऊ नका, त्यातील परिणाम पहा. परमार्थात श्रध्दा आणि विश्वास असावा, अवेशात केलेली प्रतिज्ञा कृतित आणु नका, कोणाची निंदाही करू नका आणि निंदा ऐकुही नका. कलिच्या जुगार मध्यपान मांसाहार व परस्रिगमन या चार गोष्टीपासुन दूर रहा. बाह्य शुद्धी बरोबर अतंकरणाची शुध्दी देखील आवश्यक आहे. सुख हवे असेल तर संसारातील आसक्ती कमी करा. धर्म हा आपल्या कृतीतून दिसावा .दुसर्‍याकडुन प्रेमाची अपेक्षा करत असाल तर ईतराना देखील प्रेम द्या. विषय  हे विकारांना जन्म देतात, परमार्थात  श्रध्दा असावी, स्पर्धा नको परंतु आज परमार्थात देखील स्पर्धा निर्माण होत आहे असे मौलिक विचार महाराजांनी आजच्या कथेत माडले.  आयोजित या कथेला बहुसंख्य भा़विक उपस्थित होते.

╭════════════╮
   ▌ प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment