तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

कलापथकाच्या मतदान जागराला झरी ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसादपरभणी दि.११- जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी आणि यातून लोकशाही मजबूत व्हावी यासाठी शासनाच्या वतीने स्वीप मार्फ़त मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.परभणी तालुक्यातील झरी येथील बस स्थानक जवळ राबविन्यात आपल्या मतदान जनजागराला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी महागायक यज्ञेश्वर लिंबेकर यांनी लोकशाहीला नमन करुन गिताला सुरुवात केली. शाहिर विश्वनाथ झोड़पे, मल्हारीकांत देशमुख, मोहन आल्हाट यांच्या गीतातुन जागृती करण्यात आली. कलावंतानी पथनाट्य सादर करुन मतदारांनी कुठल्याही अमीषाला बळी न पड़ता, कुठलेही व्यसन न करता, निर्भय आणि निर्भिडपने होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी शंभर टक्के मतदान करावे असा संदेश दिला. तर ज्ञानेश्वर पाथरकर, प्रफुल्ल शहाणे, रामचंद्र ब्रम्हपुरकर, विशाल धानोरकर यांची संगीत साथ लाभली. निवेदक म्हणून  प्रा.डॉ. सुनील मोडक , हनुमंत हंबिर काम पाहत आहेत. कार्यक्रमासाठी झरीचे मंडळ अधिकारी गजानन कनव,  तलाठी रवीकुमार काळे ,दादाराव ननवरे , अनिल जोशीआदींचे सहकार्य लाभले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment