तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 15 April 2019

राज ठाकरेंनी सभा घेतली तर मला आनंदच होईल : उर्मिला मातोंडकर


काँग्रेसकडून मुंबई उत्तर मतदार संघातून मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांस लोकसभेची उमेदवारी दिली आहे. मुंबई उत्तर मतदार संघात २८ टक्के मराठी मतदार आहेत. मराठी मतांवर डोळा ठेवूनच काँग्रेसने उर्मिलाला उमेदवारी दिले असून उर्मिलाही मतदारांशी मराठीतून संवाद साधताना दिसत आहे. त्यामुळे मराठीचा मुद्दा उर्मिलासाठी फायद्याचा ठरणार हे निश्चितच आहे. 
काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार उर्मिला मांतोडकर यांनी राज ठाकरेंच्या सभांचा कौतुक केलं आहे. तसेच, राज ठाकरे माझ्या मतदारसंघात सभा घेतल्यास मला आनंदच होईल. राज ठाकरेंची  सभा नकोय, असं कुणाला वाटल ? असे म्हणत उर्मिला मांतोडकर यांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी अप्रत्यक्षपणे आर्जव केलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळी, पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी आपले मत मांडले.
मनसेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून, भाजपला पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पक्षांना मदत करण्याचा निश्चय मनसेने केला आहे. मुंबई उत्तर मतदार संघात उर्मिलासमोर भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांचे आव्हान आहे. गोपाळ शेट्टी यांनी गेल्या निवडणुकीत संजय निरुपम यांचा पराभव केला होता. याआधी या मतदार संघातून अभिनेता गोविंदाने 2004 मध्ये भाजपच्या राम नाईक यांचा पराभव केला होता.
नेहमी या मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार येथुन जिंकून येतो.

No comments:

Post a Comment