तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 4 April 2019

पावभर वझडी आणी टिल्लुसाठी विकतात लाखमोलाचं मतदानबहुजन समाजात अस्मिता विकणारांची कमी नाही

आमिष दाखवुन सत्ता मिळवन्यात राजकारणी माहीर

फुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)

वाशिम-सत्तेसाठी विविध आमिषे दाखवुन भोळ्याभाबड्या जनतेला भुलवून खुर्ची मीळवन्यात राजकारणी चांगलेच माहीर असुन पावभर वझडी(मटन) आणी एका टिल्लुसाठी (दारु) आपले लाखमोलाचे मतदान विकणारेही काही कमी नाहीत त्यामुळेच बहुजनांची संख्या जास्त असुनही जातीपातीच्या कचाट्यात गुरफटवुन आणी धुर्त निती वापरुन खुर्च्या मीळवन्यात राजकारन्यांना यश मिळत आहे.
         निवडणुक म्हटली की कार्यकर्त्यांची चांदीच.पण ही चांदी नेहमीसाठी नव्हे तर फक्त प्रचार मोहीमेच्या कालावधीपुरतीच मर्यादीत राहत असुन या कालावधीत बहूतांश ग्रामीण भागातील कार्यकर्ते तर शहरी भागातील कार्यकर्तेही मोठ्या तोर्‍यात वागायला सुरुवात करतात.फक्त पाच दिवस मतदार राज्यांच्या पाया पडुन पुढे पाच वर्ष माञ याच मतदारांना पायदळी तुडवणार्‍या सत्ताधिकार्‍यांचीही कमी नाही.या निवडणूक प्रचार कालावधीत बिडी पिणारे कार्यकर्ते ब्रिस्टाॅल ओधतांना पानटपरीवर दिसत असुन माठातले पाणी पिणारे बिसलरीचे पाणी प्यायला सुरुवात करतात.या कालावधीत प्रचारातुन घरी जाते वेळी सोबत पावभर वझडी आणी एक टिल्लु द्यायलाही ऊमेदवार विसरत नाही हे विषेश.कारण दुसर्‍या दिवशीही त्याच ऐटीत कार्यकर्त्यांनी आपला प्रचार करावा ही धुर्त निती ऊमेदवार आणी त्यांचे धुर्त पुढारी वापरत असतात.
        लोकसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरु झाल्याने वाहणावर आपापल्या ऊमेदवारांचे बॅनर,पक्षांचे झेंडे लावून भोंग्यातुन प्रचार मोहीम सुरु केल्या जाते.गावोगावी जावुन आपला ऊमेदवार कीती लोकहिताचा हे लोकांना पटवुन देन्यात येत असते.पण हा प्रचार केवळ खिशात मिळालेल्या नोटेच्या वजनाने सुरु असतो हे तितकेच खरे.सखोलपणे माहीती घेतल्यास या प्रचारमोहीमेतील गाड्यामधले कार्यकर्ते महिला या रोजंदारीने आणलेल्या असतात तर काही गावात काम नाही,रिकामे आहो,प्रचारात दारु मटण,बिडीकाडी आणी शेवटी जेवायलाही मिळते अशा आशेनेही आलेल्यांची संख्या कमी नसेल.या निवडणूक प्रचार मोहीमेत विषेशतः तरुण आणी महिलांचा वापर करन्यात येत असतो.सुज्ञ मतदार माञ आपल्याला संविधानाने दिलेला लाखमोलाचा अधिकार मतपेटीतुन वापरतो पण फक्त दारु मटणासाठी काहीजन दिवसभर गोंडा घोळतात अशाच कार्यकर्त्यांचा वापर ऊमेदवारही पुरेपुर केल्याशिवाय राहत नाही.
         विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातुन सर्व प्रौढ स्ञी पुरुषांना लाखमोलाचा मतदानाचा अधिकार प्रदान केला.यामुळे झोपडीत राहणार्‍या गरीबाच्या  मतालाही तेवढीच किंमत जेवढी श्रीमंताच्या मताला आहे.ही समानता देवुन याव्दारे लोकहितासाठी ऊपयोगी असणार्‍या योग्य ऊमेदवाराला निवडुन आणुन सत्तेची खुर्ची देन्याची ताकद या मतदानामध्ये आहे.पण हा अमुल्य अधिकार थोडक्या आमीषापायी विकणारांचीही कमी नसल्याने पैशाच्या भरवश्यावर निवडणुका जिंकणारेही यशस्वी होतांना दिसत असुन निवडुन आल्यानंतर लोकहित तर लांबच परंतु त्यांच्याच टाळूवरचं लोणी खानेही हे नेते सोडत नसल्याचेही दिसते.आपल्या मताचा योग्य वापर करुन योग्य ऊमेदवार निवडुन देणे काळाची गरज असुन देशहितासाठी व विकासाठी आपल्या मतांचा मतदार राज्यांनी योग्य वापर करन्याची हिच वेळ आहे.


फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835
      8459273206

No comments:

Post a Comment