तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 11 April 2019

निवडणूक दरम्यान येणाऱ्या सन-उत्सव काळात शांतता राखा-प्रकाश एकबोटे■सेलू पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

सेलू!प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळातच विविध उत्सव येत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्सव समित्यांचे पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे यांनी केले.
मंगळवारी १० एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता पोलीस ठाण्याच्या परिसरात शांतता समितीची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश एकबोटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक संदीपान शेळके, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. संजय हारबडे, ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डाॅ. विलास मोरे, जेष्ठ पत्रकार नारायण पाटील, मिलिंद सावंत, अशोक पाईकराव, प्रसाद खारकर, शेख रहिम यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक, आभार आणि सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक एस.एस.शेळके यांनी केले. यावेळी बोलतांना उपविभागीय अधिकारी प्रकाश एकबोटे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचे मतदान १८ एप्रिलला होत असून या दरम्यान, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती संपन्न होत आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने अनेक प्रकारची बंधने आली आहेत. या काळात लोकसभेचे मतदान होत असल्याने पोलीस यंत्रणा निवडणुकीच्या कामात व्यस्त होणार आहे. त्यामुळे उत्सवासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात कमतरता भासू शकते. रात्री दहानंतर वाद्य वाजविण्यास तसेच ध्वनिक्षेपक बंदी राहणार असून निवडणुकीसाठी नेमण्यात आलेले भरारी पथक कधीही येथे येण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून काही तक्रार नोंदविण्यात आली तर, पोलिसांना नाईलाजाने गुन्हा दाखल करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्सव समित्यांचे पदाधिकारी, सदस्य तसेच नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान पोलीस पाटील संघटनेचे विभागीय प्रतिनिधी अशोक गोरे, डॉ. विलास मोरे,डॉ. संजय हरबडे, मिलिंद सावंत, सुबोध काकडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment