तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 8 April 2019

अभ्यास सोडून विद्यार्थिनी कारताहेत पाण्यासाठी कसरत


बदनापुर प्रतिनिधी  अंकुश कदम 
दुष्काळात भिषण पाणी टंचाई साठी कस्तुरबा गांधी बालिका येथिल विद्यार्थीनां अभ्यास सोडून पाणी भरावे लागते.
सध्या भिषण दुष्काळाचे चटके जनसामान्य सह विद्यार्थीनां सुध्दा सहन करावे लागत असल्याचे चित्र बघावयास मिळाले . देशाचा विकास होतो आहे असे वल्गना करणारे सरकार विद्यार्थीनां अभ्यास करण्यासाठी वेळ कमी व पाणी भरण्यासाठी जास्त वेळ घालवायला लागत आहे सध्या परिक्षा चालू असुन अभ्यास करावा की पाणी भरावे असा प्रश्न पडत आहे जनसामान्य परिस्थितीतील विद्यार्थीनी कस्तुरबा गांधी बालिका हायस्कुल मध्ये शिक्षण घेण्यासाठी आहेत पण भिषण पाणी टंचाईच्या काळात अभ्यास सोडून ट्रॕन्कर वरुन पाणी भरण्यासाठी त्यांना प्रवृत्त केल्या जात असल्याचे चित्र आज बदनापुर येथिल कस्तुरबा गांधी बालिका हायस्कुल मध्ये आहे .सरकार म्हणते की आम्ही शिक्षणासाठी खुप खर्च करुन उद्याचे भविष्य घडवत आहोत तर विद्यार्थ्यांना काम करायला लावणे हेच का तुमचे उद्याचे भविष्य घडवणे असा प्रश्न पडतो आहे.
शासकीय मुलांच्या वस्तीगृह मध्ये भिषण पाणी टंचाई असून येथे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.या वस्तीगृहातील पाचवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांना येथिल मुख्याध्यापक यांनी पाच एप्रिल रोजी सुट्टी देऊन विद्यार्थ्यांना घरी पाठविले आहे.सध्या ह्या वस्तीगृहात फक्त अग्री महाविद्यालयाचे विद्यार्थी असून रोज पाच हजार लीटर पाणी विकत घेवून तहान भागवत असल्याचे मुख्याध्यापक गीरी यांनी सांगितले .

 *तेजन्युज  हेडलाईन      प्रतिनिधी  अंकुश कदम पाटील 8390515197*

No comments:

Post a Comment