तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 13 April 2019

जिल्ह्यातील ऊस तोड कामगार स्वर्गीय मुंडे साहेबांचा भाजपाने केलेला अपमान कदापिही विसरणार नाही - धनंजय मुंडेडोंगरपट्टयात धनुभाऊला पहायला लोटली अलोट गर्दी

तेलगाव (प्रतिनिधी) :-  दि 13 ----- स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे ऊस कामगारांसाठी दैवत होते.  मुंडे साहेबांच्या प्रेमापोटी हा ऊसतोड मजूर भाजपाच्या पाठीशी उभारायचा,  मात्र याच भारतीय जनता पार्टीने मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर त्यांचा अपमान करण्याचे काम केले. जिल्ह्यातील ऊसतोड कामगार या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे .

बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ डोंगर पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडकी येथे धनंजय मुंडे यांची भव्य जाहीर सभा झाल्या त्यावेळी ते बोलत होते.

 मुंडे साहेबांनी  कामगारांसाठी मोठे काम केले.  त्यांच्या मृत्यूनंतर या सरकारने त्यांच्या नावाने ऊस तोड कामगार महामंडळाची केवळ घोषणा केली महामंडळ अस्तित्वात आले नाही.  त्यामुळेच ऊसतोड कामगारांना आज अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे . स्वतःला ऊसतोड कामगारांच्या नेत्या म्हणणाऱ्या आणि वारसदार समजणाऱ्या ऊसतोड कामगार महामंडळ बंद  होताना गप्प कशा बसल्या मी असतो तर सरकार उलथून टाकले असते असे ते म्हणाले.

 औरंगाबाद येथे मुंडे साहेबांच्या स्मारकाची घोषणा झाली मात्र त्याची एक वीटही उभा करण्याचे काम करता आली नाही ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता निघाला पाहिजे हे आपले स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कायम संघर्ष करत राहू त्यासाठी तुम्ही बजरंग सोनवणे यांना विजयी करून साथ द्या असे आवाहन मुंडे यांनी केले.

या सभेला माजी मंत्री प्रकाश दादा सोळंके,  उमेदवार बजरंग सोनवणे,  अशोक हिंगे,  सोमनाथ भाऊ बडे , जेयसिंग भैय्या सोळंके, विरेंद्र भैय्या सोळंके,  राजेश घोडे, दिनेश मस्के,  सतिष बडे,  दादासाहेब मुंडे , अंगद घुगे , कारभारी विर, कांन्ता आंधळे,  महादेव दराडे,  श्रीराम चोले , शेख खाजाभैया,  भास्कर मुंडे , बालासाहेब आंधळे,  सर्जेराव काळे‌,  महादेव गुंड, सतिष खोटे,  प्रभाकर आंधळे,  अनंत भांगे,  समशेम‌भैय,  डॉ डोंगरे , सोमनाथ दराडे,  आस्लम‌ कुरेशी,  शेख मुश्ताक,  संतोष डावकर गणेश चोले आदी उपस्थित होते.

अलोट गर्दी

धनंजय मुंडे यांच्या या सभेसाठी उत्सुकता निर्माण झाली होती सभेच्या गर्दीवरून ही उत्सुकता लक्षात आली.

No comments:

Post a Comment