तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

तेल्हारा नगराध्यक्षाना नागरिकांनी घातला घेराव पत्रकारांन विषयी नगराध्यक्षाचे बेताल वक्तव्य


तेल्हारा दि :-  नगरपालिका निवडणुका होऊन अडीच वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा नागरिकांचा पाण्याचा प्रश्न न सुटल्याने आज 10 एप्रिल ला शहरातील नागरिकांनी थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्ष जयश्री पुंडकर यांना घेराव घालून आपल्या समस्या मांडून प्रश्नांचा भडिमार करण्यात आला

       शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्यासाठी नेहमीच वणवण भटकावे लागत असल्याने यावेळेस उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच येथील नागरिकांना पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जाऊन त्रास सहन करावा लागत आहे पाण्याचा प्रश्न घेऊन नागरिक वेळोवेळी पदाधिकारी व प्रशासनाला याबाबत लेखी तसेच तोंडी अवगत करत आले आहेत तरीसुद्धा तेल्हारा पालिकेकडून आत्तापर्यंत कुठलीही ठोस अशी उपाययोजना करण्यात न आल्याने तसेच रोजच्या त्रासाने वैतागलेल्या येथील महिलांनी व नागरिकांनी थेट नगराध्यक्ष जयश्री पुंडकर यांना आपल्या प्रभागात बोलावून समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला नागरिकांनी केलेल्या प्रश्नांचा भडीमारामुळे नगराध्यक्ष यांचे नाकी नऊ आले होते .नगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाकडून दरवेळेस फक्त आश्वासनांची खैरात वाटून जनतेचे प्रश्न मात्र जैसे थे ठेवण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या आक्रोशाला आज नगराध्यक्ष तसेच न प प्रशासनाला सामोरे जावे लागले यावेळी प्रश्नांचा भडिमार मधून सुटण्यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवक व प्रशासनाणे आता आचारसंहितेचे कारण पुढे करत नागरिकांच्या प्रश्नांना थांबते केले.आचारसंहिता गेली काही दिवसांपूर्वी लागलेली असताना पाण्याचा प्रश्न मात्र वर्षानुवर्षे चालत आला आहे त्यामुळे टाळूवरचे लोणी खाण्याचे काम तेल्हारा नगर परिषद करीत असल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला. यावेळी नगराध्यक्ष यांनी तुमच्या प्रभागासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली असून लवकर समस्या सोडवण्यात येईल असे सांगितले मात्र हा प्रश्न नेहमीचा असून गेल्या कित्येक वर्षापासून फक्त आश्वासनांची खैरात कामांचा लेखाजोखा सांगण्यात येतो मात्र प्रत्यक्षात उपाययोजना अमलात येत नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी नागरिकांनी केला. तसेच यावेळी नागरिकांनी अजून काही महिने त्रास सहन करावा असा सल्ला सुद्धा देण्यात येऊन पाण्याच्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल असे सांगितले जर पाण्याच्या टॅंकरने पाणी पुरवठा केल्या जात असणार तर नळयोजना कशासाठी आणि बिलाचा भरणा आम्ही का करावा असा प्रयत्न सुद्धा यावेळी उपस्थित करण्यात आला होता. या सर्व प्रकारावर नागरिकांच्या मते तेल्हारा नगरपालिका जनतेविषयी गंभीर नसल्याचे उपस्थित सुज्ञ नागरिकांनी बोलून दाखवले.
–------------------------------------------------------

*नगराध्यक्षाचे पत्रकारांविषयी बेताल वक्तव्य*

आज पाण्यासंदर्भात प्रभाग क्रमांक ६ च्या नागरिकांनी घेराव घातला असता वृत्तकणासाठी उपस्तीत असलेल्या पत्रकारांना उद्देशून पत्रकारांना काय फक्त बातम्या छापण्याचे काम असून पत्रकारांना जे छापायचे असणार ते छापा मला काही फरक पडत नाही असे बेताल वक्तव्य नगराध्यक्षा पुंडकर यांनी केल्याने उपस्थित जनता सुद्धा अवाक झाली होती.नेमका नगराध्यक्ष याना कशाचा गर्व आहे की त्या अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करत सुटल्या आहेत त्यांना हे न शोभणारे आहे.हे उपस्थितांनी बोलुन दाखविले    -----------------------------------------------------

No comments:

Post a Comment