तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 2 April 2019

वाशिम यवतमाळ मतदार संघात केला जात आहे नियमबाह्य निवडणुक प्रचार
सबंधित विभागाने कारवाई करन्याची गरज

फुलचंद भगत(जिल्हा प्रतिनिधी)
वाशिम-सध्या वाशिम यवतमाळ लो निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला असुन विविध पक्षाचे आणी अपक्ष ऊमेदवार प्रचाराच्या कामी लागले आहेत.पण दुसरीकडे हाच निवडणुक प्रचार नियमबाह्य होत असलेलाही पाहावयास मिळत असुन अशा नियमबाह्य निवडणुक प्रचार करणार्‍या वाहनावर भरारी पथक आणी पोलिसांनी कारवाई करन्याची गरज आहे.निवडणूक प्रचारासाठी वाहणांना परवानगी देतेवेळी नियमात राहुन प्रचार करन्याची लेखी सुचना देन्यात येते परंतु पोलिसांच्या व निवडणूक विभागांच्या नियमांनाही न जुमानता सर्रास नियमबाह्य प्रचार सुरु असल्याने पोलिसही याकडे दुर्लक्ष करतांना दिसुन येत आहेत.अशीच घटना मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव येथे घडली असुन नियमात राहुन प्रचार न करन्याच्या कारणावरुन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  भरारी पथकाने एका पक्षाचे वाहन पकडले असुन त्यावर योग्य ती कारवाई करन्याचे आदेश मिळाल्याने मंगरुळपीर महसुल विभाग आणी पोलिस अधिकारी यांचेकडुन सबंधीत वाहणावर कारवाई करन्याची प्रक्रीया सुरु आहे.चालत्या गाडीतुन प्रचार तसेच शाळा,दवाखाने आदी ठिकाणी गाडीतुन भोंगे वाजवुन प्रचार करणे तसेच याप्रकारच्या अनेक नियमांचा भंग निवडणूक प्रचाराच्या गाड्या आणी कार्यकर्ते करीत असुन सबंधीत विभाग माञ बघ्याची भुमिका घेत आहे.परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी कुणालाही न जुमानता निवडणुक आचारसंहिता आणी नियमबाह्य गोष्टींचा अवलंब केल्यास सबंधितावर कडक कारवाई करन्याचे निर्देश दिल्याने साहेबांच्या आदेशाची कितपत पालन केल्या जाईल तसेच असे नियम तोडणारांवर कारवाई होईल का याकडे संपुर्ण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार क्षेञातील लोकांचे लक्ष लागले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment