तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 4 April 2019

सोमेश्वर मंदिर येथे महारूद्र जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह.


तेजन्यूज हेडलाईन्स प्रतिनिधी 
 सोनपेठ : शहरातील ग्राम दैवत श्री सोमेश्वर मंदीर  दहिखेड येथे प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी महारूद्र जन्मोत्सवा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज  ज्ञानेश्वरी पारायण  व श्रीराम कथा ,  सोहळा  दि.12 एप्रिल शुकवार  रोजी  प्रारंभ होत असुन   सांगता दि. 19 एप्रिल  रोजी होणार आहे.
    श्रीराम  कथेचे यजमान श्री गंगाधर अंबादास आवाड हे असुन कथा  संगीत रामकथा प्रवत्या रामायणाचार्य  ह.भ.प. नयनाताई   साळवे  आपल्या  मधुर वाणीतुन कथा सांगणार आहेत. यांना साथ  जगन्नाथ महाराज गिरी ,श्रीमंत मुंडे  महाराज, नंदु अवघड़े महाराज ,भालचंद्र मुंडे महाराज हे देतील ,   दैनंदिन कार्यक्रमात पहाटे  काकडा आरती, विष्णु सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन,दु. १ ते ४  श्रीराम कथा ज्ञानयज्ञ, शिवलिला अमृत, हरिपाठ,रात्रो ९ ते ११ नामवंत किर्तनकारांचे   हरिकिर्तन होणार आहे.
    या निमित्त  शुक्रवार रोजी ह. भ .प . प्रबोधनकार हनुमान गुरूजी रनेरवाड़ीकर, शनिवार ह.भ.प.कु . वैष्णवी बालकीर्तनकार आलंदी देवाची , रविवार   ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज   खेर्डेकर , सोमवार ह.भ.प. मुकुंद महाराज गात विनोद मूर्ती हिस्सीकर , मंगळवार ह.भ.प.  आकाश महाराज पाटिल पंढरपुरकर , बुधवार  ह.भ.प. गंगाधर महाराज कुरुंदकर,  गुरुवार  ह.भ.प प्रसाद महाराज रोहिणीकर , शुक्रवार   ह.भ.प.बापुसाहेब महाराज पंढरपुरकर    यांचे सकाळी ११ ते १ काल्याचे किर्तन होणार आहे. सामुदायीक महाप्रसाद होऊन   सप्ताहाची सांगता होणार आहे.या धार्मीक कार्यक्रमाचा भावीक भक्तानी  लाभ घ्यावा असे अवाहन समस्त गावकरी मंडळी दहिखेड,सोनपेठ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment