तेजन्यूजहेडलाईन्सचा दुसरा वर्धापण दिना निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 10 April 2019

भारत विकासाच्या दृष्टीने प्रगती पथावर :पियुष गोयल


बाळू राऊत मुंबई जिल्हा प्रतिनिधी
मुंबई :दि. 10 भारताचे एक पाऊल विकासाकडे घेऊन जाण्याचा एक यशस्वी प्रयत्न भारतीय जनता पक्षाने आयोजित यशवंत चव्हाण सभागृहात करण्यात आला. यावेळी मंचावर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल, शिक्षण मंत्री विनोद तावडे, अतुल शहा, खासदार अरविंद सावंत, फॅमचे विनेश मेहता,  तसेच इतर मान्यवर उपस्थित होते
केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून जावेत यासाठी संपूर्ण कार्यकर्ता नेता कामाला लागले आहे. आणि दोन तृतीयांश आकडा पूर्ण करून परत या देशाला नरेंद्र मोदी सारखे नेतृत्व मिळून देऊ असा एक संकल्प केला आहे. पाच वर्ष एक इमानदार सरकार, देशाची सुरक्षा, आतंकवाद विरोधी ठोस भूमिका, भारताची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम या सरकारने केले आहे. देशातील 103 करोड जनतेच्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी  सरकारने काम केले आहे. स्वातंत्र्यच्या नंतर देशातील सर्वात कमी महागाई या पाच वर्षांत कमी करण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. अर्थव्यवस्था बळकटी करण्याचे काम, देशातील गरीब, शेतकरी, महिला, आदिवासी, वंचित, युवा यांच्यापर्यत विकास पोहोचविण्याचे काम देखील या सरकारने केले आहे
स्वातंत्र्यच्या 65 वर्षानंतर देखील आमच्या आया बहिणी या उघड्यावर संडास करतात या पेक्षा शरमीची गोष्ट कोणतीच असू शकत नाही. आणि हे बंद करण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. घर तिथे शौचालय झाले पाहिजे. टॉयलेट एक प्रेम कथा या पिक्चर मध्ये दाखविले आहे मी रेल्वे मंत्री असल्याने हे चांगलेच माहित आहे. स्वातंत्र्यच्या 65 वर्षानंतर  कॉंग्रेस सरकारने जेवढे एल पी. जी. कनेक्शन दिले तेवढेच कनेक्शन पाच वर्षांत भाजपा सरकारने केले आहे. ज्या गावात वीज नव्हती तिथ पर्यंत वीज या सरकारने पोहोचली आहे. देशात सुमारे दीड करोड लोकांना मोफत वीज दिली गेली आहे. गावोगावी पक्क्या सडक बनविल्या गेल्या,
देशातील सुमारे 50 हजार करोड लोकांना आरोग्यच्या दृष्टीने आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार आहे. तसेच अनेक प्रकारचे टॅक्स प्रणाली संपून जीएसटी लागू करण्याचे काम देखील सरकारने केले आहे. करदात्यांचा परतावा त्यांना त्यांच्या अकाऊंटवर लवकरात लवकर मिळणार याची काळजी सरकारने घेतली आहे. शेतकर्‍यांना त्याचा 6000 रुपयाचा हफ्ते त्यांच्या अकाऊंट मध्ये जमा केले. गेल्या पाच वर्षात या सरकारने भ्रष्टाचार बंद केला आहे, महागाई, शेतकर्‍यांना पीक विमा, मुद्रा लोन सामान्य लोकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात हे सरकार सफल झाले आहे
 केंद्रात मोदींचे हात बळकट करण्यासाठी जिथे भाजपाचे उमेदवार असतील तिथे कमळाचे बटन दाबून मतदान करा. आणि जिथे शिवसेनेचे उमेदवार असतील तिथे धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबून मतदान करा.

No comments:

Post a Comment